कैरीचे जांभळे सरबत

Published by आदिती पाध्ये on   April 8, 2019 in   2019Food Corner

कैरीचे जांभळे सरबत बनवण्यासाठी लागणारे-

साहित्य:

 1. २ मध्यम कैऱ्या (साधारण २ वाट्या कैरीचे तुकडे)
 2. १/२ वाटी काळ्या मनुका
 3. १ लहान आकाराचे बीट (बिटाचे तुकडे १/२ वाटी)
 4. गोडीसाठी १ १/२ वाटी काकवी
 5. २ वाट्या लिक्विड गूळ
 6. चिमूटभर मीठ
 7. १/२ लहान चमचा जायफळ पूड

कृती:

 1. काळ्या मनुका दोन तास पाण्यात भिजवून ठेवा.
 2. कैरी व बिटाचे छोटे तुकडे करा.
 3. कैरीचे तुकडे, भिजवलेल्या काळ्या मनुका व बिटाचे तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करून घ्या व ते गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणात साधारण तीन ग्लास पाणी घाला.
 4. वरील मिश्रणात मीठ, जायफळ पूड व काकवी घालून एकत्र करा. सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमध्ये हवे असल्यास फिरवा.
 5. तयार सरबत फ्रिजमध्ये दोन तास ठेवून थंडगार पिण्यास द्या.