Wednesday, 24 July 2019 24-Jul-2019

Category: Festivals

श्रावण महिना – श्रावणमास

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत.

Continue Reading

आदित्य पूजन

Published by Kalnirnay on   August 11, 2018 in   Festivalsश्रावणमास

आदित्य पूजन : श्रावणातील  प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. तेही शक्य नसेल तर नुसता भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.   श्रावणी

Continue Reading

मत्स्यजयंती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   March 19, 2018 in   Festivals

चैत्र शुक्ल पंचमी ह्या तिथीला इतर अनेक व्रते शास्त्रात सांगितलेली असली तरीही ‘मत्स्यजयंती’ मुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार हा मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले असले तरीही पां. वा. काणे ह्यांनी चैत्र शुक्ल पंचमीला ‘मत्स्यजयंती’ केली जाते असे म्हटले आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूच्या मत्स्यावतारी

Continue Reading

रथसप्तमी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 23, 2018 in   Festivals

माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे विशेष नाव आहे. ह्या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेतही अतिशय महत्त्व आहे. ‘व्रतासाठी ही सप्तमी अरुणोद्यव्यापिनी घ्यावी’ – असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे. व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त (एक वेळ जेवून-) राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य होईल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करुन तो दिवा वाहत्या पाण्यात

Continue Reading

मकरसंक्रांत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 13, 2018 in   Festivals

मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. दक्षिणेकडे याचवेळी ‘ पोंगल ‘ म्हणून जो सण साजरा होतो, तोदेखील तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी ‘ भोगी पोंगल ‘ अथवा इंद्रपोंगल म्हणून तो इंद्रासाठी साजरा करतात तर तिसऱ्या दिवशी ‘ मट्ट पोंगल ‘ हा गाईगुरांची पूजा करून

Continue Reading

गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   December 24, 2017 in   Festivalsव्यक्तीचरित्र

‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’ हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे ! जन्माची कथा गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश

Continue Reading

श्रीदत्त जयंती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   December 2, 2017 in   Festivals

मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्तमंदिर असते तेथे ह्या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा केला जातो. ह्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘श्रीगुरुचरित्र’ ह्या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. दत्तजयंतीच्या

Continue Reading

गीता जयंती

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   November 29, 2017 in   Festivals

मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. गीतेचा या दिवशी जन्म झाला म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जातो. या एकादशीला मोक्षदा एकादशी असे नाव आहे आणि भगवद्गीता ही मोक्षदा आहे, अशी अनेक साधुसंतांची साक्ष आहे. “श्रीमद्‌भगवद्‌गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मळ हिरा आहे. पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक

Continue Reading

अंगारक संकष्ट चतुर्थी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   November 6, 2017 in   Festivals

आज अंगारक संकष्टी. कुठल्याही कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ज्या प्रदेशात चंद्रोदय होत असेल, ती तिथी ही संकष्ट चतुर्थी आणि माध्यान्हकाळी जिथे शुक्ल चतुर्थी मिळत असेल, ती विनायक चतुर्थी, असा याबाबतचा ढोबळ नियम. ५०-६० वर्षापूर्वी हा चतुर्थीचा शास्त्रार्थ ठरवितांना बरीच भवति न भवति होत असे. चतुर्थी तृतीया तिथीने युक्त असली की तिला मातृविद्धा आणि पंचमी तिथीने युक्त

Continue Reading

प्रबोधिनी एकादशी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 30, 2017 in   Festivals

चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास नाव आहे. ह्या दिवशी भक्तमंडळी भजन, कीर्तन, गायन तसेच विविध वाद्यांचा गरज करतात. प्रथम मंत्रोच्चारांसह देवाचे आसन तसेच देऊळ फुलापानांनी, तोरणांनी सजवावे. देवाची पूजा करावी. प्रल्हाद, नारद, व्यास आदी भगवद्‌भक्तांचे

Continue Reading