राजगिरा पिठाच्या पुऱ्या

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   July 3, 2017 in   उपवासाच्या रेसीपी
Spread the love

साहित्य:

  • पाव किलो राजगिरीचे पीठ
  • २ मोठे बटाटे (उकडलेले)
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • पाणी

कृती:

  1. तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.
  2. मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे.
  3. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
  4. बटाट्याच्या भाजीबरोबर अथवा गोड दह्याबरोबर या पुऱ्या खाण्यास द्याव्यात.

  कालनिर्णय स्वादिष्ट