गुळाची पोळी

Spread the love

गुळाची पोळी कशी बनवाल –

साहित्यः


  1. ५०० ग्रॅम गूळ किसलेला
  2. १ वाटी तीळ कूट
  3. खसखस कूट
  4. ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले
  5. १ टेबलस्पून खोबरे
  6. २|| टेबलस्पून डाळीचे पीठ
  7. २ वाट्या कणीक
  8. १ वाटी मैदा

पाकनिर्णय २०१९ मध्ये तुमची रेसिपी पाठवा व जिंका आकर्षक बक्षिसे!

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

कृती:


  • कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे.
  • चांगला पिवळा गूळ किसून घ्यावा.
  • तीळ, खसखस, खोबरे जरा भाजून घ्यावे व नंतर कुटावे किंवा यंत्रावर पूड करावी.
  • २|| टेबल स्पून डाळीचे पीठ थोडया तुपावर चांगले भाजून घ्यावे.
  • वेलचीची पूड करावी आणि सर्व एकत्र करून मळून ठेवावे.
  • नंतर कणकेच्या दोन लाट्यात गुळाची १ मोठी गोळी घालून कडा दाबून हलक्या हाताने पोळी लाटावी.
  • नंतर पुरणपोळीच्या तव्यावर खमंग भाजावी.
  • गुळाची पोळी गारच चांगली लागते म्हणून अगोदर करून ठेवाव्या.

वरील प्रमाणात २० पोळया होतात.


 – सौ.मंगला बर्वे | या महिन्याचा मेनू – कालनिर्णय जानेवारी १९७४