नारळाच्या करंज्या

साहित्य :

 • २ मोठे नारळ
 • ३ वाटया साखर
 • १०-१२ वेलदोडे
 • थोडेसेच बेदाणे
 • ३ वाटया बारीक रवा
 • १ वाटी मैदा
 • अर्धी वाटी डालडाचे मोहन
 • तळण्यासाठी डालडा किंवा रिफाईंड तेल
 • चवीपुरते मीठ
 • पीठ भिजविण्यासाठी दूध

कृती:

 1. रवा व मैदा एकत्र करुन त्यात मीठ घालावे.
 2. तूप (डालडा) पातळ करुन घ्यावे.
 3. हे मोहन गरम करुन पिठात घालणे. हे पीठ दुधात भिजवणे.
 4. साधारण १ तास तरी पीठ भिजले पाहिजे. नेतर हे पीठ पाटयावर चांगले कुटून घ्यावे.
 5. त्याच्या अगदी छोटया छोटया लाटया कराव्यात. स्वच्छ पांढरे कापड घेऊन ते जरासे ओले करुन लाटयांवर ठेवावे.
 6. नारळ खवून घ्यावा. त्यात साखर मिसळावी. जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण घालून ते गॅसवर ठेवावे.
 7. साखर विरघळली व मिश्रण एकजीव झाले की खाली उतरवावे.
 8. वेलदोडयाची पूड व बेदाणे घालून मिश्रण सारखे करावे. सारण पूर्ण गार होऊ द्यावे.
 9. ओल्या फडक्यात झाकून ठेवलेल्या लाटयांच्या पातळ पातळ पुऱ्या लाटाव्यात.
 10. त्यात नारळाचे सारण भरुन त्याला करंजीचा आकार देऊन कडा जुळवून घ्याव्यात.
 11. कडांना दुधाचा हात लावावा. कातण्याने कापून करंज्या मंदाग्नीवर तळाव्यात.