तांबड्या भोपळ्याच्या पुरणपोळ्या

Published by सौ. स्मिता सुधाकर वाळवेकर on   March 11, 2017 in   Food Corner

पुरणासाठी लागणारे साहित्य :


 • २५० ग्रॅम तांबडा भोपळा
 • २०० ग्रॅम साखर अगर गूळ
 • चवीप्रमाणे वेलची पूड
 • अगर जायफळ /  कोणत्याही आवडणारा इसेन्स
 • २० ग्रॅम खसखस
 • अर्धी वाटी बेसन

पोळीसाठी लागणारे साहित्य :


 • १ मोठी वाटी मैदा अगर बारीक चाळणीतून चाळलेली कणिक
 • वर लावायला मैदा अगर तांदळाचे पीठ
 • ५० ग्रॅम तूप ( साजूक असल्यास उत्तम) / तूप

कृती :

 • कणिक अगर मैदा जास्ते मोहन घालून मऊ भिजवून ठेवावे . भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून कोणत्याही साधनाने वाफवून घ्याव्यात, चांगला शिजला पाहिजे.
 • भोपळा थंड होऊ द्यावा, थंड झालेला भोपळा (साले काढलेला), साखर, बेसन वेलची अगर जायफळ , एकत्र करावे.
 • पळीने घोटून एकजीव करावे.  गैसवर ठेवून गोळा होऊ द्यावा, मात्र साखरेचा पाक होता कामा नये .
 • आता भिजलेल्या कणकेच्या / मैद्याच्या छोट्या गोळ्या तयार कराव्यात. भोपळ्याच्या पुरणाच्या गोळीपेक्षा थोडे मोठे गोळे तयार करावेत.
 • पुरणपोळी प्रमाणे हे पुरण कणकेत भरून अलगद हाताने पोळी लाटावी. लाटताना थोडा मैदा लावावा.
 • आता ही पोळी हळूच तव्यावर मंदाग्नीवर भाजावी. एक बाजू झाल्यावर सर्व बाजूने तूप अगर तेल सोडावे.
 • पोळीवरही तूप सोडावे व पोळी उलटावी. दुसरी बाजू  झाल्यावर नंतर पोळी कालथ्याने दुमडून उतरवावी. तुपाशी अगर नारळाच्या दुधाशी खाव्यात. एवढ्या साहित्याच्या साधारण मध्यम आकाराच्या सहा पोळ्या होतात.

 – सौ. स्मिता सुधाकर वाळवेकर(पाकनिर्णय, १९८६)