मसाला दूध

Published by पाकनिर्णय on   October 4, 2017 in   Food Corner

साहित्यः


 • १ लिटर दूध
 • साखर
 • १० ते १२ बदाम
 • ५ ते ६ पिस्ते
 • ५ ते ६ काजू
 • जायफळपूड किंवा वेलचीपूड

CLICK HERE TO PARTICIPATE IN PAKNIRNAY 2019 CONTEST

कृतीः


 1. मंद आचेवर दूध आटवा.
 2. १ लिटर दूध असेल तर आटवून १/२ लिटर दूध करा.
 3. गरम असतानाच आवडीनुसार त्यात साखर घाला. गॅस बंद करा.
 4. बदाम आधीच भिजत ठेवा, नंतर त्याची साले काढा.
 5. अर्ध्या बदामाचे पातळ काप करा. उरलेले जाडसर वाटा.
 6. पिस्त्याचे बारीक काप करा, काजूचे पातळ काप करा.
 7. दुधात सर्व सुका मेवा चांगला एकजीव करा.
 8. सर्वात शेवटी वरुन जायफळपूड किंवा वेलचीपूड घाला

वेगळा रंग घालण्याची गरज नाही. दूध चांगले आटवल्यामुळे मसाले दूधाला बदामी रंग येईल.

टीपः कोजागरी पौर्णिमेला मसाल्याचे दूध आवर्जून दिले-घेतले जाते. कोजागरीला चंद्रप्रकाशात आटवलेले मसाला दूध पिण्याची परंपरा आहे.