प्रबोधिनी एकादशी

चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास नाव आहे. ह्या दिवशी भक्तमंडळी भजन, कीर्तन, गायन तसेच विविध वाद्यांचा गरज करतात. प्रथम मंत्रोच्चारांसह देवाचे आसन तसेच देऊळ फुलापानांनी, तोरणांनी सजवावे. देवाची पूजा करावी. प्रल्हाद, नारद, व्यास आदी भगवद्‌भक्तांचे […]

‘तटस्थ’ तें ध्यान, विटेवरी !

तुकोबांनी विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्र्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत […]