आपल्याला वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा निसर्गचक्रात दरवर्षी नव्याने पुरवठा होण्याचे दिवस म्हणजे मुख्यत: पावसाळ्याचे. कोकणपट्टी वगळली तर महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात सामान्यत: १५ ते २० मोजके दिवसच पाऊस पडतो. पावसाच्या या मर्यादित दिवसांमध्ये पृथ्वीतलावर पडणारे पाणी वेळीच नीट साठवून घेतले नाही, तर हातचे निघून जाते. पावसाच्या दिवशी पडणारा पाऊसही सातत्याने संथपणे पडत नाही. दिवसातील थोडाच वेळ, पुष्कळदा […]
