साहित्यः तांदूळ २ वाटया बारीक चिरलेला गूळ ३ वाटया एका नारळाचा चव भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी वेलदोडे ३-४ मीठ पाव चमचा लवंगा तूप दुधात भिजवलेले केशर कृतीः एक पळी तुपावर लवंगा फोडणीला टाका. तांदूळ परतून घ्या. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मोकळा भात करा. वाफ जिरल्यावर परातीत काढा. गरम आहे तोवरच त्यात नारळाचा चव, किसलेला गूळ […]
2017
नारळीपौर्णिमा
नारळीपौर्णिमा/श्रावण पौर्णिमा : (नारळीपौर्णिमा) ह्या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण ‘उत्सव’ म्हणून साजरा करतात. कोळीवाड्यातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध […]
खुशखुशीत कंटोळी
साहित्यः १० कंटोळी १ वाटी किसलेले ओले खोबरे १/२ वाटी पनीर १/२ वाटी मावा २ हिरवी मिरची, कोथिंबीर आलं तांदळाचे पीठ कुरकुरीत नायलॉन शेव चाट मसाला मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृतीः कंटोळीला देठाकडे कापून मीठ घातलेल्या पाण्यात उकळवावे. नंतर गाळून घ्यावे व आतील बिया अलगद काढाव्या. नंतर हिरवी मिरची, […]
दिंडा – श्रावण रेसिपी
साहित्य: ( १३ ते १४ दिंड्यांसाठी ) चणाडाळ – २ वाट्या गूळ – २ वाट्या वेलची आणि जायफळ पूड (आवश्यकतेनुसार) कणीक – २ वाट्या पाणी साजूक तूप श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृती: २ वाट्या चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यात २ वाटी गूळ घालून पुरण घट्ट होईपर्यंत आटवून घेणे. वेलची व […]
वरदलक्ष्मी व्रत
श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, […]
दुसरा श्रावणी सोमवार
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतात एक जत्रा भरते. ती पुढे बरेच दिवस चालू असते. ह्यावेळी गोडधोड खाण्याचे. जेवणाचे आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी सगळी मंडळी मिरवणूक काढून नदीवर जाऊन मंत्रोच्चारांसह वरूण देवतेसाठी त्या नदीच्या पात्रात वाहत्या प्रवाहामध्ये मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ सोडतात. मग सर्वजण परस्परांना अत्तर लावून मिठाई वाटतात. […]
श्रावणी रविवार : आदित्य राणूबाई व्रत
आदित्य राणूबाई व्रत श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. ह्या व्रताच्या […]
श्रावणी शनिवार
१) अश्र्वत्थ-मारुती पूजन: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. […]
श्रावणी शुक्रवार – जरा-जिवंतिका पूजन
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव […]
श्रावणी गुरुवार
श्रावणी गुरुवार ह्या दिवशी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबांत परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. सद्यःस्थिती : ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वत. हा पाठ करावा. शारीरिक व्याधी असल्यास सक्षम आणि शुद्ध आचार-विचार असलेल्या ब्राह्मणाकडून हा पाठ करवून घ्यावा. अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.