मुले आणि विविध स्क्रीन – डॉ. सागर मुंदडा

आजच्या जगात आपण बघतो की प्रत्येक घरात, प्रत्येक मुलाकडे टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, उपलब्ध झाले आहे. घरात शौचालय नसेल पण मोबाईल नक्की असतो. सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे वाहून जात आहोत. पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी लहानपणीच मोबाईल हातात देतात‧ ज्या वयात त्यांना धड चालताही येत नसते अशा वयात त्यांच्या हातात मोबाईल येतो‧ विचार केला तर आज कुठल्याही गोष्टींबद्दलची माहिती आपल्या बोटाच्या एका क्लिकवर मिळू लागली आहे‧ खरंतर ही चांगली गोष्ट आहे पण मुलांच्या वागणुकीत या सगळ्यामुळे सकारात्मक बदल दिसतायत का? याचे पण विश्लेषण करणे गरजेचे‧

तज्ज्ञांनुसार –

१) दोन वर्षांपेक्षा लहान मुलाला कुठल्याही प्रकारच्या Screen ची सवय लागायला नको‧ (कारण – या वयात बुद्धी व मेंदूतले Connection वेगवान गतीने निर्माण होत असते‧ यासाठी गरजेचे आहे माणसांशी संबंध आणि सुसंवाद‧

२) मोठ्या मुलांमध्ये Screen time २ तासांपेक्षा जास्त नसावा‧

वास्तविकता एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीमधून आलेले निष्कर्ष

वय ८ ते १० वर्षे – रोज ६ ते ८ तास Screen time, जास्त वयाचे मूल १० तास Screen time/ daily

पण याच्यापेक्षाही मोठी समस्या काय? पालक आपल्या स्वतःच्या वागणुकीतून या प्रवृत्तीला सुरुवातीला प्रोत्साहन देतात‧ (उदा‧ चार वर्षांचा चिंटू घरात दिवसभर मस्ती करत असे‧ त्याला शांत कसे करण्यासाठी पालकांनीच त्याच्या हाती दिला स्मार्टफोन‧ दुसरे म्हणजे पालकच दिवसभर कुठल्यातरी स्क्रीनवर असतात, ते कुठल्या तोंडाने आपल्या पाल्याला सांगणार‧ तिसरे म्हणजे बहुतांश लोकांना ही जाणीव नाही की स्क्रीनचे व्यसन होऊ शकते‧ त्यांच्यानुसार हा फक्त ‘टाईमपास’ आहे, किंवा आपले मूल जगाबद्दल माहिती घेत आहे, हुशार होत आहे, मग का बंद करायचा आम्ही टीव्ही ? हाही प्रश्न अगदी योग्य वाटतो‧ स्क्रीनचे व्यसन ही तर काल्पनिक गोष्टच वाटते‧ इथेच आपली विचारधारा चुकते‧ जरा समजून घेऊया‧

आपल्या मेंदूत एक Pleasure/Rewind Centre असतो‧ कुठलीही गोष्ट करताना जेव्हा आपल्याला खूप चांगले वाटते (स्वादिष्ट भोजन, आवडीचा खेळ खेळताना) तेव्हा मेंदूच्या या भागात डोपामीन नावाचे रसायन वाढते‧ पण ही झाली Rewind Centre ला उत्तेजित करण्याची नैसर्गिक पद्धत‧ हे लोक कुठल्यातरी व्यसनाच्या अधिन झाले असतात‧ (उदा‧ दारू, गांजा, गर्द) त्यामध्ये हाच Pleasure Centre खूप जास्त प्रमाणात उत्तेजित झालेला असतो‧ त्याला जर ते नाही मिळाले, तर माणसाला चांगले वाटत नाही, माणूस वेडापिसा होतो‧

जागतिक पातळीवर झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, खूप जास्त स्क्रीन टाईममुळेसुद्धा असेच बदल घडत आहेत‧ Infact, Video Games ची रचना अशा प्रकारे होत चालली आहे की जास्तीत जास्त डोपामीन निर्माण व्हावा आणि त्याचे व्यसन लागावे. आणि एकदा जर का व्यसन लागले तर त्याच्यावर उपचार करणे हे दारूड्याकडून दारू सोडविण्यापेक्षा ही अवघड आहे‧

अधिक स्क्रीन टाईममुळे होणारे मानसिक परिणाम

(१) नैराश्य (Depression) व दडपण (Anxiety)चे आजार बळावण्याची शक्यता वाढते‧

(२) खूप काळ हिंसात्मक व्हिडिओ गेम्स खेळल्यामुळे मुलांमध्ये हिंसेलाच सर्वसाधारण क्रिया समजण्याची प्रवृत्ती निर्माण होते‧ अशी बालके आपल्या वास्तविक जीवनात जास्त हिंसक असतात‧

(३) टेक्नोलोजी हे ‘Personal face to face Human Interact’ साठी एक खूप दुर्बल पर्याय आहे‧ ३ ते १० वर्षे या वयोगटातील मुलांमध्ये Really Testing म्हणजे ‘काय खरं’, ‘काय काल्पनिक’, ‘काय वास्तविक आहे’ याची जाणीव निर्माण होते‧ या वयात जास्त स्क्रीन व Social Media वर जो वेळ जातोय त्याच्यामुळेच मुलांमध्ये Reality आणि Vertual चा फरक नाहीसा झाला आहे‧ सध्या घडत असलेल्या ‘Blue Whale’ गेममुळे आत्महत्या हा या गोष्टींचा पुरावा आहे‧

(४) ADHD (चंचलता) (Attention Deficit Hyperctivity Disorder) नी ग्रस्त मुलांचे प्रमाण वाढतेय, आणि ज्यांना हे अतिशय जास्त अस्वस्थतेचा त्रास अगोदरच आहे, त्यामध्ये तीव्रता वाढते‧ स्मरणशक्ती व एकाग्रता खूप कमी होते‧

(५) रात्री झोपतानासुद्धा स्क्रीनच्या समोर असल्याने निद्रानाश, Poor quality of sleep, अपूर्ण झोपेमुळे दिवसभर थकलेले असणे व नवीन गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो‧ तरूण मुलांमध्ये हे त्रास अगोदर नव्हते आज त्याची साथ आली आहे‧

(६) अतिशय जास्त Screen Time आणि Social Media मुळे मानसिक सर्जनशीलता आणि  कल्पनाशक्तीला वेळ मिळत नाही‧ दीर्घकाळात यामुळे मेंदूचा समोरचा भाग (frontal cartes), जो आपल्याला विवेकशील निर्णय घेण्यासाठी सज्ज करतो, त्याचा योग्य विकास होत नाही यामुळे मुले जास्त हट्टी, हेकेखोर बनतात‧

शारीरिक त्रास

(१) लहान वयात बोटांमध्ये दुखणे, मनगटांवर दुखणे, सांध्यांचे आजार होण्याची शक्यता‧

(२) डोळ्यांच्या रक्तवाहिन्या  आकुंचन पावतात‧ यामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो‧

(३) अतिशय कमी वयात पाठदुखी जडू लागली आहे‧

(४) सतत एका ठिकाणीच बसून राहिल्यामुळे लहान तसेच किशोरवयीन मुलांमध्ये स्थूलपणा वाढत चालला आहे‧

मग या व्यसनापासून मुक्ती कशी मिळणार?

(१) स्क्रीन टाईम वर निरीक्षण तसेच त्यावर योग्य ते बंधन असावे‧

(२) छंदाला प्रोत्साहन – उदा‧ जर मुलाला वाचनाची आवड असेल तर त्याला दर आठवड्याला एक नवे पुस्तक द्या व ते वाचून पूर्ण झाल्यावर त्यास एक बक्षीसही द्या‧

(३) खेळांसाठी वेळ द्या – खेळामुळे मुलांचे मन रमते‧ शरीराला पुरेसा व्यायामही मिळतो‧

(४) घरकामामध्ये मदत – यात तो स्क्रीनपेक्षा दूर राहून जास्तीतजास्त त्याला तुमचा सहवास लाभेल‧ असे करण्याने तो वेळेची शिस्त (Time Management) आणि स्वच्छतेबद्दलही शिकेल‧

(५) वेळ निर्धारित करणे – मोबाईल व कॉम्प्युटर कितीवेळ वापरावा त्याचा एक तक्ता करून द्यावा‧

(६) जे मुलांना सांगता तेच स्वतः जपा – पालकांनी स्वतःचा Screen Time निर्धारित करावा‧ कारण या वयातच मुले जे आई-वडिलांचेच अनुकरण करतात‧ आपणच त्यांचे  आदर्श बना‧ मुलांना स्वतःचे गॅजेट घेऊन देणे शक्यतो टाळा‧

(७) टीव्ही, कॉम्प्युटर या वस्तू कॉमनरूममध्ये ठेवा‧ कारण या गॅजेटमधून येणारा ब्राईट ब्ल्यू लाईट मेलाटोनीन नावाच्या रसायनाची उत्पत्ती होऊ देत नाही आणि त्यामुळे झोप येत नाही‧ म्हणूनच Screen तुमच्या मुलाच्या मानसिक, शारीरिक विकासात बाधा आणू नये यासाठी पालकांनी सजग राहावे‧


डॉ. सागर मुंदडा

One comment

  1. छंदोपनिषद् | छंद | गौरी डांगे | August 2019 | Kalnirnay

    […] आपल्या मुलांमध्ये छंद जोपासावेत, यासाठी पालकांनी काही गोष्टी करायला हव्यात : […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.