विनायक संकष्ट चतुर्थी व्रत

विनायक संकष्ट चतुर्थी व्रत-श्रावण कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. दिवसभराचा उपवास करु शकता. सायंकाळी स्नान करुन शुचिर्भूत होऊन मग नेहमीप्रमाणे श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत […]

साबुदाण्याची चकली

साबुदाण्याची चकली

साबुदाण्याची चकली बनविण्यासाठी  – साहित्य: १ वाटी साबुदाणा अर्धा वाटी वऱ्याचे तांदूळ मीठ जिरे पाणी कृती: आदल्या दिवशी साबुदाणा धुवून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा वाटी पाणी उकळून साबुदाण्यात घालावे. वऱ्याचे तांदूळ भाजून स्वच्छ करुन अर्धा वाटी पाण्यात फळफळीत शिजवणे. साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ, मीठ, जिरे एकत्र कालविणे. हे चांगले मळणे व चकल्यांच्या सोऱ्यातून चकल्या पाडणे […]

दधिव्रत व पंचमहापापनाशन व्रत

१. दधिव्रत दधिव्रत नावातच ह्या व्रतामध्ये दह्याला विशेष महत्त्व असल्याचे सूचित केलेले आहे. ह्या दिवशी पाळण्यातल्या श्रीधराची पूजा करावी. अहोरात्र आनंदोत्सव साजरा करावा. व्रतकर्त्याने आणि इतर मंडळींनीही ह्या दिवशी केवळ दही खाऊन राहावे. प्रत्येकाने पाळण्याला झोका द्यावा. ह्या व्रतामुळे पंचमहायज्ञाचे फल मिळते असे सांगितले आहे. सद्य स्थिती: केवळ दह्याऐवजी दुधापासून बनलेले दही, ताक, लस्सी, पीयूष असे पेयपदार्थही […]

रक्षाबंधन

रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) : श्रावण पौर्णिमेला नारळीपौर्णिमेच्या उत्सवाएवढेच आणखी एका सणामुळे महत्त्व आहे. ते म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा । रक्षाबंधनासाठी सूर्योदयापासून सहा घटिकांहून अधिक व्यापिनी आणि भद्रारहित अशी श्रावण पौर्णिमा असावी असा शास्त्रार्थ आहे. पौर्णिमेची वृद्धी असेल म्हणजे दोन दिवस पौर्णिमा असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी सहा घटिकांपेक्षा कमी वेळ ही पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी भद्रारहित […]

योग जीवनाचे सार

पतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील? तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास […]

झूलन यात्रा

उत्तर प्रदेशात झूलन यात्रा हा उत्सव म्हणून साजरा होतो. हा उत्सव श्रावण शुक्ल दशमी ते पौर्णिमा असा दीर्घकाळ चालतो. कशी साजरी केली जाते झूलन यात्रा: ह्यावेळी राधा-कृष्णांच्या मूर्ती झोपाळ्यावर ठेवून त्याला झोके दिले जातात. त्यावेळी जमलेल्या स्त्रिया एकत्रितपणे कृष्णगीते म्हणतात. ह्या निमित्ताने श्रीमंत मंडळींच्या घरी कृष्णचरित्रपर नाट्यप्रसंगही आयोजिले जातात. सद्यःस्थिती : आपल्या कौतुकाच्या देवांचे कोडकौतुक […]

दूर्वाष्टमी व्रत

श्रावण शुक्ल अष्टमी ह्या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. ह्या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती ह्यांची पूजा करावी. पूजा झाल्यावर आठ गाठी मारलेला दोरा व्रतकर्त्या स्त्रीने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला बांधावा. शेवटी ‘त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। […]

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत दूर्वागणपती व्रत: दूर्वागणपती व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते. तशी ती नसल्यास जर दोन्ही दिवशी असेल तर पहिल्या दिवशीची ‘पूर्वविद्धा ‘ चतुर्थी ह्या व्रतासाठी ग्राह्य मानली जाते. व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. […]

श्रावण | Shravan | Shravan Month | Shravan 2020

श्रावण महिना – श्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. […]

आदित्य पूजन

आदित्य पूजन : श्रावणातील  प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. तेही शक्य नसेल तर नुसता भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.   श्रावणी […]