” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः । ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील […]
