आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]
