अॅपल | Apple Relish Recipe | Apple Recipe | Sweet Apple Relish | cranberry apple relish

अॅपल रेलिश | अर्चना चौधरी, पुणे | Apple Relish | Archana Chaudhary, Pune

अॅपल रेलिश

साहित्य: २ सफरचंद, १ इंच दालचिनी, ३ लवंगा, १ चक्रीफूल, २ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे साखर, १/२ लिंबू, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा तेल.

कृती: सफरचंदाच्या बिया काढून लहान तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात दालचिनी, लवंगा, चक्रीफूल आणि लाल सुक्या मिरच्या घाला. मग सफरचंदाच्या फोडी, साखर, मीठ व अर्ध्या लिंबाचा रस घाला. पाच ते सात मिनिटे शिजल्यानंतर पाणी सुटल्यावर मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्या. मिश्रणातले सुके मसाले, दालचिनी, लवंगा व सुक्या मिरच्या काढून घ्या. उर्वरित मिश्रण मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट करा. अॅपल रेलिश तयार आहे.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अर्चना चौधरी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.