कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ
साहित्य : १/२ कप कलिंगडाच्या साली, ५-६ मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, १ वाटी गहू, ज्वारी, तांदूळ पीठ, १/२ वाटी बेसन, १ चमचा तीळ, १/२ चमचा ओवा, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा धणे-जिरे पूड, १/२ चमचा हळद, तेल, तूप, मीठ‧
कृती : कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग किसून घ्या. कढईत तेल घेऊन त्यात मिरच्या, आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता यात हळद, धणे-जिरे पूड, किसलेल्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग घाला. मग गहू, ज्वारी, तांदूळ पीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तीळ,ओवा, चवीनुसार मीठ घालून थालीपिठासारखे मळून घ्या. तयार पीठ अर्धा तास कपड्याने झाकून ठेवा. गॅसवर तवा गरम करून त्यात थालीपीठ थापा. थालीपिठाला मध्यभागी भोक पाडून बाजूने तूप सोडा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. हे थालीपीठ सॉस किंवा कैरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुनीता मोरवाडकर, पुणे