Thursday, 18 October 2018 18-Oct-2018

Category: Health Mantra

ऑक्टोबर हीट

Published by Kalnirnay on   October 11, 2018 in   Health Mantra

ऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा – उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे. गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल. भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर

Continue Reading

डोळ्याचा नंबर

Published by Dr. Sudha Surlikar on   October 4, 2018 in   Health Mantra

सर्वप्रथम हे लक्षात घेणे जरुरीचे आहे, की डोळ्याचा नंबर हा आजार नसून ते डोळ्याच्या लांबीचे नॉर्मल प्रकार आहेत. जशी माणसांची उंची कमी-जास्त असते आणि माणूस पाच फुटी असो अथवा सहा फुटी तो नॉर्मलच गणला जातो, त्याप्रमाणे मायनस किंवा प्लस नंबरचे डोळे नॉर्मल समजले जातात. डोळ्याला येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर

Continue Reading

आहारातून सौंदर्य

Published by Dr. Sarita Davare on   September 26, 2018 in   2018Health Mantra

आहार म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ खाणे एवढेच नव्हे तर प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ यांचा समतोल तुमच्या आहारातून साधला जातो आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. जर मी खाल्ले तर रात्री खिचडी खाईन म्हणजे मी समतोल आहार घेतला असे नाही. ज्वारी पौष्टिक आहे. म्हणून ज्वारीच्या एका वेळेला चार-पाच भाकऱ्या खाल्ल्या असे चालत नाही. संतुलित आहार हा

Continue Reading

योग जीवनाचे सार

Published by Dr. Ravin Thatte on   August 21, 2018 in   Health MantraYoga Excercise

पतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील? तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास

Continue Reading

ऋतुचक्र व आरोग्य

Published by Kalnirnay on   August 7, 2018 in   2018Health Mantra

” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः । ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील

Continue Reading

हिरव्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व

Published by Dr. Sarika Satav on   August 6, 2018 in   Health Mantra

हिरव्या पालेभाज्या – आरोग्य सुधारण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या पदार्थांमध्ये अग्रगण्य अशा हिरव्या पालेभाज्या आहेत. रोजच्या आहारामध्ये वापरता येऊ शकणाऱ्या व भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या. या पालेभाज्या आबालवृद्धांसाठी हितकारक व आरोग्यवर्धक ठरतात. सर्वसाधारणपणे हिरव्या पालेभाज्या या कमी कॅलरीज असलेल्या, पण त्यांच्यामध्ये प्रोटीन, तंतुमय पदार्थ, ‘ क ‘ जीवनसत्त्व, फोलिक अॅसिड, कॅल्शियम इ. जीवनसत्त्वे मुबलक

Continue Reading

पोपटाचा डोळा

Published by Sugandha Indulkar on   July 20, 2018 in   Health Mantra

मन, मनाची शांती, जाणिवा, एकाग्रता या गोष्टींचे मूळ फार जुन्या परंपरांमध्ये हिंदू बौद्ध आणि अगदी प्राचीन चिनी परंपरांमध्येही आढळते. मनावर उठणारे तरंग हा विषय तेव्हापासून हाताळला गेला आहे. मन शांत असणे, जागरूक असणे, सावध असणे याचा अभ्यास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पण हा विषय जेव्हा प्रायोगिक मानसशास्त्राच्या चष्म्यातून बघितला जातो तेव्हा त्यात मनाची किंवा

Continue Reading

पावसाळ्यातील विकार

Published by vaidya Kusum Antarkar on   July 19, 2018 in   Health Mantra

पावसाळ्याचा विचार मनात आल्याबरोबर एक विशेष प्रकारचे वातावरण डोळ्यांसमोर येते. या वातावरणाने पावसाळा सुरू झाल्याची जाणीव होते. असा हा वातावरणाचा फरक होण्याचे कारण पृथ्वी व सूर्य यांची गती. पृथ्वी व सूर्य यांच्या गतीमुळे वातावरणात जे बदल होतात त्यांचा मनुष्यशरीरावर होणाऱ्या परिणामाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने आयुर्वेद शास्त्रज्ञांनी संबंध वर्षाचे दोन भागामध्ये वर्णन केले आहे. आपला

Continue Reading

आई आणि बाळ: पूरक आहार

Published by Kalnirnay on   July 14, 2018 in   Health Mantra

गर्भवती अवस्था आणि स्तनपानाचा काळ यामध्ये आईचे पोषण फार महत्त्वाचे असते. बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ त्यावर अवलंबून असते, हा विचार तसा सर्वत्र आढळणारा आणि पारंपरिक. परंतु त्याची शास्त्रोक्त माहिती आज प्रत्येक सुजाण व्यक्तीला असायला हवी. जागतिक आरोग्यसंघटना आणि युनिसेफ यांनी नेमका हाच विचार मांडला आहे. त्यांच्या मते बाळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी १००० दिवस मोलाचे असून

Continue Reading

योगाभ्यासाचा श्रीगणेश

Published by Sadashiv Nimbalkar on   June 20, 2018 in   Yoga Excercise

योगाभ्यासाचा ‘श्रीगणेश’ करताना….लक्षात ठेवा – योगाभ्यासाचा ‘प्रारंभ’ शक्यतो प्रत्यक्ष गुरुकडून शिकण्याने व्हावा हा उत्तम मार्ग. पण ते शक्य नसल्यास लेख चांगला वाचून, समजून-उमजून योगाभ्यास सुरु करण्यास हरकत नाही. पण हा दुय्यम मार्ग आहे हे विसरू नये. काही श्वसन संबंधित प्रकार व प्राणायाम सोडून इतर सर्व प्रकारांत श्वसन सामान्य (नॉर्मल) व नैसर्गिक ठेवावे. यौगिक प्रकार साधताना,

Continue Reading