साबुदाण्याची चकली

साबुदाण्याची चकली

साबुदाण्याची चकली बनविण्यासाठी  –

साहित्य:

  • १ वाटी साबुदाणा
  • अर्धा वाटी वऱ्याचे तांदूळ
  • मीठ
  • जिरे
  • पाणी

कृती:

  1. आदल्या दिवशी साबुदाणा धुवून ठेवणे.
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा वाटी पाणी उकळून साबुदाण्यात घालावे.
  3. वऱ्याचे तांदूळ भाजून स्वच्छ करुन अर्धा वाटी पाण्यात फळफळीत शिजवणे.
  4. साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ, मीठ, जिरे एकत्र कालविणे.
  5. हे चांगले मळणे व चकल्यांच्या सोऱ्यातून चकल्या पाडणे व उन्हात वाळविणे.

टीप: ह्या चकलीत बटाटा घालू नये. त्याने चकली चिवट,कडक होते. 

Click here for more recipes

2 comments

  1. ढोकळा | उपवासाचा ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९

    […] २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ […]

  2. उसळ | उपवासाची मिसळ | उल्का ओझरकर | कालनिर्णय | २०१९

    […] १/२ वाटी काजू, १/२ वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेल्या बटाट्याच्या […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.