सोड्याची खिचडी बनविण्याकरिता –
साहित्य :
- १ कप सोडे स्वच्छ धुवून, बारीक तुकडे केलेले
- २ कप मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
- १ कप तांदूळ (शक्यतो सुरती कोलम) धुवून घेतलेले
- २ मध्यम आकाराचे बटाटे साले काढून व फोडी केलेले
- १ टीस्पून हळद
- २ टीस्पून तिखट (सीकेपी मसाला : मसाल्यातच धणे व थोडी बडीशेप असते)
- चवीप्रमाणे मीठ
- २-४ लवंगा
- २-३ तुकडे एक इंच दालचिनीचे
- ४-५ कमी तिखट हिरव्या मिरच्या
- १ कप चिरलेली कोथिंबीर
- १-२ तुकडे एक इंच आल्याचे
- १ टेबलस्पून सुके खोबरे
पूर्वतयारी :
- आले, मिरची, लसूण, कोथिंबीर यांची बारीक वाटून गोळी तयार करावी. धणे, लवंग, दालचिनी, सुके खोबरे, एक कांदा भाजलेला, या सर्वांची पावडर करून घ्यावी.
- अर्ध्या नारळाचे घट्ट दूध काढून घ्यावे.
कृती :
- गॅसवर जाड बुडाचे पातेले तापत ठेवावे.
- तेलावर फोडणीला दोन लवंगा, एक-दोन दालचिनी, एक मसाला वेलची टाकावी.
- त्यावर कांदा फोडणीस टाकावा.
- तो चांगला परतला की, त्याच वेळी बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.
- त्या परतल्या की लगेचच मसाल्याची गोळी टाकावी.
- त्यानंतर हळद, सीकेपी मसाला (तिखट), मीठ घालावे.
- तांदळाच्या अडीच पट गरम पाणी पातेल्यात ओतावे.
- वाफ यायला लागल्यावर तयार करून ठेवलेले घट्ट नारळाचे दूध त्यावर ओतावे.
- त्याला चांगली वाफ येऊ द्यावी.
- त्याच्या आधी पातेल्याच्या खाली गरम तवा ठेवावा म्हणजे खिचडीला वाफ चांगली येते व ती करपत नाही.
- नंतर खिचडी तयार होत आल्यावर खिचडीवर साजूक तूप अलगद सोडावे.
- तयार केलेली कोथिंबीर खिचडीवर पसरून ती गरमागरम सर्व्ह करावी.
ह्यात सोडे कधी घालायचे ते लिहिलेलेच नाही नं?