साहित्य :
- बारीक रवा पाव वाटी,
- तूप १ चमचा, दूध २ वाटया
- पाणी अर्धी वाटी
- साखर ४ चमचे
- स्वादाकरता जायफळ-वेलची पूड
- केशर
- सुका मेवा
- मीठ
कृती :
- तुपात रवा मंद आचेवर भाजा.
- थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या.
- त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला.
- यानंतर दूध घालावे.
- जाडसर झाले की गॅस बंद करा. खीर तयार!
टीप : गरम पाणी घातल्यास रवा छान फुलून येतो.
श्रावण खाद्ययात्रा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
Khirit dudh kadhi ghalave te lihile nahi ahe
नमस्कार प्रज्ञा, सर्व जिन्नस घातल्यानंतर त्यात आपण दूध घालू शकता.