कैरी जॅम रोल बनविण्यासाठी –
साहित्य:
- १ कैरी
- १-२ टेबलस्पून आंब्याचा रस
- १/२ वाटी साखर
- २-३ पोळ्या
- तूप
कृती:
- कैरीची साल काढून कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी.
- थंड झाल्यावर त्याचा गर व्यवस्थित कोयीपासून सुटा करावा.
- त्यात साखर घालून जाड बुडाच्या भांड्यात शिजवावा.
- अधूनमधून ढवळत राहावे.
- साखर विरघळून मिश्रण आधी पातळ होईल आणि नंतर परत घट्ट होईल.
- मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात आंब्याचा रस घालून ढवळावे.
- मिश्रण टोमॅटो केचपइतपत घट्ट झाले की, गॅसवरून उतरवावा.
- हा जॅम थंड झाल्यावर काचेच्या बरणीत काढून शक्यतो क्रिजमध्ये ठेवावा.
- जॅमरोल डब्यात द्यायच्या वेळेस पोळी तूप लावून गरम करावी.
- त्यावर तयार जॅम घालून रोल करून तो गरम तव्यावरच ठेवावा.
- थोडा लालसर झाला की, उतरवून एका सेलचे कात्रीने कापून तीन तुकडे करावेत. खायला सोपे पडते.
तुमची रेसिपी ठरु शकते महाराष्ट्राची महारेसिपी! इथे क्लिक करा
[blogpostmessage title=”Paknirnay 2021″ buttontext=”Visit Now” link=”https://www.kalnirnay.com/paknirnay/”]Click Here to Participate in the Paknirnay 2021 Recipe Contest and Win Exciting Prizes.[/blogpostmessage]
Note : पोळी पातळ असेल तर हा रोल छान क्रिस्पी होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आंबटगोड पदार्थ खायलाही छान वाटतात तसेच ते पोषकही ठरतात. एरवी आपण मुलांना बाहेरचे कृत्रिम जॅम खायला देतो, त्यात नैसर्गिक फळे अगदी नावालाच असतात. (काही अपवाद असतील . ..) त्यापेक्षा असे सिझनल फळांचे जॅम बनवून मुलांना पोळीचा रोल किंवा ब्रेडजॅम दिले तर ते तितकेसे हानीकारक ठरणार नाही.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.