Gavhale Bhaat | Indian pasta | Rice

गव्हले भात ( पारंपरिक रेसिपी )

गव्हले भात बनवण्यासाठी –

साहित्य:

  1. १ वाटी गव्हले
  2. १ वाटी साखर
  3. १ वाटी आंब्याचा रस
  4. १ वाटी खवलेला नारळ
  5. ४ चमचे साजूक तूप
  6. १ वाटी पाणी
  7. सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे
  8. १/४ वेलची पावडर

कृती:

  1. प्रथम गव्हले तुपात चांगले भाजून घ्या. उकळून आलेल्या एक वाटी पाण्यात हे गव्हले मोकळेच शिजवून घ्या व थंड करत ठेवा.
  2. नंतर दुसऱ्या पातेल्यात साखर व आंब्याचा रस एकत्र करून साखर विरघळल्यावर त्यात खवलेला नारळ घाला.
  3. घट्ट होत आल्यावर त्यात शिजवलेले गव्हले घाला व चांगले ढवळून दोन वाफा येऊ द्या.
  4. नंतर त्यात साजूक तूप व वेलची पावडर, काजू, बदाम, बेदाणे घाला व परत एक वाफ येऊ द्या.
  5. नंतर मूद पाडून व काजू, बदाम, बेदाणे यांनी सजवून खाण्यास द्या. चवीला गव्हले भात खूप छान लागतो.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.