केक | banana cake | banana cake recipe | eggless banana recipe | banana birthday cake | elite banana cake | sprouted cereals

केळीच्या खोडाचा आणि अंकुरित तृणधान्यांचा आरोग्यवर्धक केक | कांचन रानडे, डोंबिवली | Healthy cake of banana trunk and sprouted cereals | Kanchan Ranade, Dombivali

केळीच्या खोडाचा आणि अंकुरित तृणधान्यांचा आरोग्यवर्धक केक

साहित्य॒: २०० ग्रॅम बारीक चिरलेले केळीचे खोड, प्रत्येकी १ मोठा चमचा मोड आलेली ज्वारी, नाचणी, बाजरी, गहू, तृणधान्ये शिजविण्यासाठी ४ मोठे चमचे पाणी, २ मोठे चमचे ज्वारी, नाचणी, कणीक (गव्हाचे पीठ), कुळीथ पीठ (कुळीथ पीठ नसल्यास बाजरी पीठ घ्यावे), १ मोठा चमचा ओट्स (न भाजता), १ मोठा चमचा जवस पावडर (न भाजता केलेली पावडर), १ मोठा चमचा बदाम पावडर (ऐच्छिक), १ मोठा चमचा किसलेला लाल भोपळा, गाजर व कोहळा, १/२ कप आणि ३ मोठे चमचे दूध, १/२ कप बारीक केलेला गूळ (नैसर्गिक), १ मोठा चमचा साजूक तूप, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, १/२ छोटा चमचा खाण्याचा सोडा.

कृती॒: प्रथम तृणधान्ये दहा तास पाण्यात भिजत घाला. नंतर पाण्यातून निथळून मोड आणण्यासाठी सगळी तृणधान्ये वेगवेगळ्या फडक्यात बांधून ठेवा. मोड यायला साधारणपणे तीन ते चार दिवस लागतात. नंतर सगळी तृणधान्ये एकत्र करून धुऊन घ्या आणि त्यात पाणी घालून कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या करून शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटा. जे पाणी शिजण्यासाठी घेतले होते तेच पाणी घ्या. केळीचे खोड स्वच्छ धुऊन बारीक चिरा. नंतर त्यात दूध घालून मिक्सरमध्ये मऊसर वाटून घ्या. नंतर त्यात गूळ घालून परत वाटा. आता या वाटलेल्या मिश्रणात वर दिलेली पिठे, साजूक तूप, वाटलेली तृणधान्ये, किसलेले गाजर, भोपळा, कोहळा, ओट्स, जवस, बदाम यांची पावडर घालून हाताने कालवून घ्या व दहा मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर या मिश्रणात सोडा, बेकिंग पावडर, वेलची पावडर घाला. आपण केक कुकरमध्ये करणार आहोत. कुकर दहा मिनिटे प्रीहिट करत ठेवा. (गॅस मंद ठेवा. कुकरची रिंग, शिटी काढा व आत पाणी अजिबात ठेवू नये.)

केक पॉटला तुपाचा हात लावून त्यात बटर पेपर घाला. बटर पेपरलाही तुपाचा हात लावा. आता त्यात तयार केलेले मिश्रण घालून केक बेक करायला ठेवा. वीस ते तीस मिनिटांनी केकवर काजू, बदाम लावून डेकोरेट करा. (आधी घातले तर तळाशी जातात. बेक झाल्यानंतरही केक डेकोरेट करू शकता.) टूथपिकने किंवा सुरीने केक बेक झाला की नाही ते बघा. चिकटला नाही की केक तयार झाला असे समजा. थोडा थंड झाला की पॉटमधून केक काढा.

टीप॒: केळीचे खोड म्हणजे केळीच्या झाडाचा मधला भाग. केळीचा घड तयार झाला, की ते झाड तोडले जाते. त्या वेळी हे केळीचे खोड काढून घेता येईल. भाजी शॉपमध्येही मिळते.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कांचन रानडे, डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.