केक | chocolate delight cake | rich chocolate cake | simple chocolate cake | chocolate chocolate cake | chocolate egg cake recipe | chocolate cake with egg

चॉकलेट ईस्टर केक | बिंबा नायक | Chocolate Easter Cake | Bimba Nayak

चॉकलेट ईस्टर केक

स्पंजसाठी साहित्य : २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट, ६ मोठे चमचे दूध, १७५ ग्रॅम बटर, १७५ ग्रॅम कॅस्टर शुगर, ४ मोठी अंडी (फेटलेली), १५० ग्रॅम मैदा, ३/४ चमचा बेकिंग पावडर, १०० ग्रॅम बदाम.

सजावटीसाठी साहित्य : १५० ग्रॅम मिल्क चॉकलेट, २८४ मि.लि. डबल क्रीम, डस्टिंगसाठी कोको पावडर, २०० ग्रॅम प्लेन चॉकलेट.

कृती : ओव्हन १८०० सेल्सिअसवर प्रीहिट करा. २ × २० सें.मी. गोलाकार केकच्या दोन भांड्यांना तेल लावा आणि त्यात बेकिंग पेपर घाला. स्पंज तयार करण्यासाठी, चॉकलेटचे तुकडे करा आणि एका पातेल्यात दूध व चॉकलेटचे हे तुकडे घाला. हे पातेले गरम पाण्यात ठेवा आणि चॉकलेट वितळेपर्यंत हलवत राहा. दुसऱ्या पातेल्यात बटर आणि साखरेचे मिश्रण करा व क्रीम तयार होईपर्यंत ढवळत राहा. त्यात अंडी, मैदा, बेकिंग पावडर आणि बदाम घाला. आता त्यात वितळलेले चॉकलेट घाला आणि एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. हे मिश्र्ेाण तेल लावून तयार केलेल्या केकच्या दोन डब्यांमध्ये घाला. मिश्रणाची पातळी सपाट असू द्या. २५-३० मिनिटे किंवा घट्ट होईपर्यंत हे मिश्रण बेक करा. केक बेक झाल्यावर टिनमधून काढून घ्या आणि जाळीवर थंड करायला ठेवा. ट्रफल्स तयार करण्यासाठी मिल्क चॉकलेटचे बारीक तुकडे करा. पाच मोठे चमचे डबल क्रीम जड बुडाच्या कढईत घ्या आणि वाफ येईपर्यंत व क्रीमच्या कडांवर बुडबुडे येईपर्यंत उकळवा. आता यात चॉकलेटचे तुकडे घाला आणि पातळ होईपर्यंत हलवत राहा. हे मिश्रण लहान वाडग्यामध्ये ओता आणि फ्रीजमध्ये सेट/थंड करायला ठेवा. मिश्रणाला आकार देता येईल इतपत सेट करून घ्या. चमचाभर मिश्रण घ्या आणि हाताला कोको पावडर लावून मिश्रणाला अंड्याचा आकार द्या. अशी साधारण अठरा अंडी तयार करा. ही अंडी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता चॉकलेटची कपची तयार करण्यासाठी बोर्डवर दोन ओळीत चॉकलेट लावून घ्या. छोट्या, धारदार चाकूने चॉकलेटचे पातळ तुकडे कापा. चॉकलेट क्रीम कव्हरिंग बनविण्यासाठी राहिलेल्या चॉकलेटचे तुकडे करा. शिल्लक राहिलेले क्रीम गरम करा. यात चॉकलेटचे तुकडे आणि कपची बनविताना उरलेला चॉकलेटचा चुरा घालून ढवळून घ्या. सर्व चॉकलेट विरघळेपर्यंत ढवळत राहा. आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये ओता आणि त्या मिश्रणाला आकार देण्याइतपत घट्ट होईपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. केक सजावट करण्यासाठी एका डिशमध्ये एक स्पंज ठेवून त्यावर एक तृतीयांश चॉकलेट क्रीम पसरवा. यावर आता दुसरा स्पंज ठेवा आणि राहिलेले चॉकलेट सर्व बाजूंना लावा, पॅलेट सुरीने त्यावर आकर्षक कोरीव काम करा. अंड्याच्या आकाराचे गोळे केकच्या कडांवर रचा. चॉकलेटचा चुरा काळजीपूर्वक त्या गोळ्यांभोवती पसरवा. खायला देईपर्यंत हा केक थंड जागी ठेवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


बिंबा नायक            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.