बटरवळ्या

खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज | सौमित्र वेलकर | Khimya Batarwala with poha brinj | Soumitra Welkar

खिम्याच्या बटरवळ्या विथ पोह्याची बिरींज

खिम्याच्या बटरवळ्या

पाठारे प्रभूंच्या घरी जेव्हा लग्न जमल्यावर सून अथवा जावई सर्वप्रथम आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला येतात तेव्हा खिम्याच्या बटरवळ्या व सोबत पोह्याची बिरींज त्यांना कौतुकाने खाऊ घालायची पद्धत आहे.

सारणाचे साहित्य: १/२ किलो मटण खिमा, १/२ किलो उभे पातळ चिरलेले कांदे, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ वाटी हिरवे मटार, २ मोठे चमचे किशमिश, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ छोटा चमचा हळद, २ छोटे चमचे लाल तिखट, १ छोटा चमचा पाठारे प्रभू सांबार मसाला, आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व तळणासाठी तेल.

आवरणाचे साहित्य: १/२ किलो उकडून किसलेला बटाटा, १/२ छोटा चमचा जिरेपूड, २ छोटे चमचे लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, ४-५ मोठे चमचे ब्रेडचा चुरा, आवश्यकतेनुसार मीठ.

सारणाची कृती:  सर्वप्रथम कढईत तेल घेऊन उभे पातळ चिरलेले कांदे लालसर होईपर्यंत तळून घ्या. नंतर एका भांड्यात मटण खिम्यात तळलेल्या कांद्याचा चुरा, आले-लसूण पेस्ट, मटार, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट सांबार मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. तयार मिश्रण प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घ्या. प्रेशर कुकर थंड झाल्यानंतर त्यात किशमिश व चवीनुसार मीठ घाला.

आवरणाची कृती:  एका भांड्यात उकडून किसलेला बटाटा, जिरेपूड, लाल तिखट, हळद, ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ घालून पिठासारखे मळून घ्या. आवरणाचे व सारणाचे प्रत्येकी वेगवेगळे लहान गोळे बनवा. तयार बटाट्याच्या गोळ्यात खिम्याचा गोळा भरून पॅटीस वळा. ताटाला तेल लावून तयार पॅटीस तीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. कढईत तेल तापवून पॅटीसला लालसर रंग येईस्तोवर तळून घ्या. सर्व्ह करा खिम्याच्या बटरवळ्या.

टीप: पाठारे प्रभू सांबार मसाल्या-ऐवजी कोणत्याही मिक्स मसाल्याचा वापर करू शकता.

पोह्याची बिरींज

साहित्य: १ वाटी पातळ पोहे (धुऊन निथळवलेले), ३/४ वाटी बारीक साखर, २ लवंग, २ वेलदोडे, १ मोठा चमचा तूप, ७-८ केशराच्या काड्या व गरजेनुसार गरम पाणी.

कृती:  सर्वप्रथम गरम पाण्यात केशर काड्या दोन ते तीन तास भिजवून ठेवा. नंतर एका पसरट भांड्यात तूप घेऊन मंद आचेवर तापवून घ्या. त्यात लवंग व वेलदोडे घालून परतवा. नंतर  निथळलेल्या पोह्यांना पातेल्यावर पसरवून घ्या. साखर व भिजवलेले केशर घालून साखरेचा पाक तयार होईल. पाक पोह्यांमध्ये मुरेस्तोवर मंद आचेवर ठेवा. सर्व्ह करा पोह्याची बिरींज.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


सौमित्र वेलकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.