चटणी | Tadgola Chutney | Chutney Recipe | Ice Apple Chutney

ताडगोळ्याची चटणी | लेखा तोरसकर, ठाणे | Tadgola Chutney | Lekha Toraskar, Thane

ताडगोळ्याची चटणी

साहित्य: ३ ताडगोळे, १ छोटा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या), १ दालचिनी, अख्खा खडा मसाला, १ छोटा चमचा हळद, १ चमचा साखर, १ चमचा किसलेले आले, १ चमचा मनुका, १ छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स, २ चमचे तेल, १ चमचा दही, आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ.

कृती:  साल काढून ताडगोळे बारीक कापून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि अख्खा खडा मसाला घाला. छान परतून घ्या. त्यात बारीक कापलेले ताडगोळे घाला आणि परता. आता हळद, चवीनुसार मीठ, एक कप पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर ताडगोळे शिजू द्या. आवश्यकता असल्यास अजून पाणी घाला. साखर, किसलेले आले, मनुका, रेड चिली फ्लेक्स आणि दही घालून छान एकत्र करा. मंद आचेवर एक-दोन मिनिटे झाकून ठेवा आणि गॅस बंद करा. थंड करून काचेच्या बरणीमध्ये ठेवा.

टीप:  ब्रेड, पराठा, चपातीसोबत ही चटणी छान लागते. फ्रीजमध्ये ही चटणी चार-पाच दिवस टिकते.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


लेखा तोरसकर, ठाणे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.