लाडू | | Ladoo Recipe | Indian cooking | Indian cuisine | Indian sweet | sugar free ladoo

आरोग्य लाडू | आदिती पाध्ये, डोंबिवली

आरोग्य लाडू

साहित्य : ७०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम मेथीदाणे, १०० ग्रॅम हिरवे मूग, १०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्रॅम खारीक पावडर, ५० ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम सुंठ पावडर, ५० ग्रॅम अक्रोड, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अळशी, ५० ग्रॅम डिंक, १ किलो किसलेला  गूळ, १ किलो गाईचे तूप, १ चमचा वेलची, १ चमचा जायफळ पूड, २ वाट्या पाणी‧

कृती : सर्वप्रथम डिंक तळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या‧ मंद आचेवर खसखस, सुके खोबरे, खारीक पावडर, बदाम व अळशी वेगवेगळे भाजून थंड झाल्यावर पूड करा‧ मग ज्वारी, मूग व मेथीदाणे एकत्र करून त्याचे पीठ दळून घ्या‧ हिरवी वेलची मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्या व पूड करा‧ थंड झाल्यावर त्यात जायफळ  पूड, सुंठ पावडर घालून एकत्र करा‧

लाडू बनविण्याची कृती : गॅसवर कढई ठेवून थोडे तूप घालून दळलेले पीठ भाजून घ्या. दुसऱ्या गॅसवर छोट्या भांड्यात दोन वाट्या पाणी उकळून घ्या. एका कढईत अर्धी वाटी तूप, गूळ व उकळलेले पाणी घालून गूळ विरघळवून पंधरा-वीस मिनिटे मंद आचेवर ठेवा. भाजलेली पिठे, खारीक, बदाम, अक्रोड, अळशी पावडर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर, डिंक पावडर, खोबरे पावडर व भाजलेली खसखस एकत्र करून घ्या. सर्व एकत्र केलेली पिठे गुळाच्या पाकात घालून मिश्रण एकजीव करा. हाताला तूप लावून लाडू वळा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


आदिती पाध्ये, डोंबिवल

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.