दूध | Shrikhand Recipe | Shrikhand Ingredients | Homemade Shrikhand | Corn Recipe | Shrikhand Recipe in Marathi | Shrikhand Dish | Vegan Shrikhand

मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड | प्रियंका माने, जोगेश्वरी | Maize(Corn) Shrikhand | Priyanka Mane, Jogeshwari

मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड

साहित्य : २५० ग्रॅम मक्याचे पातळ दूध, १५० ग्रॅम खडीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/२ छोटा चमचा जायफळ पूड, प्रत्येकी १ मोठा चमचा तमालपत्र-दालचिनी-काळी मिरी-नागकेशर पूड, १/२ छोटा चमचा सुंठ पावडर, १ मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा मध, आवश्यकतेनुसार केशर दूध.

कृती : मक्याचे दूध कढईत मंद आचेवर उकळत ठेवा व सतत ढवळत राहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करून बाऊलमध्ये काढून घ्या. यात वाटलेली खडीसाखर घालून मिश्रण एकजीव करा. नंतर केशरमिश्रित घालून तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, नागकेशर, सुंठ, जायफळ, वेलची या सर्वांची पूड एकत्र करून दुधाच्या मिश्रणात घालून चांगले ढवळून घ्या. नंतर तूप व मध घालून ड्रायफ्रूट्सने सजवा.

टीप : पित्ताचा त्रास असणाऱ्यांना आणि दही किंवा चक्का यांचे सेवन न करता येणाऱ्या अशा सर्वांना या आयुर्वेदिक श्रीखंडाचे सेवन करता येईल.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्रियंका माने, जोगेश्वरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.