शेंगा | Nutritious Drumstick Ladoo | Anjali Bondre | Ladoo | Laddu | Laddoo | Indian Sweet

शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक लाडू | अंजली बोन्द्रे, डोंबिवली | Nutritious Drumstick Ladoo | Anjali Bondre

शेवग्याच्या शेंगा चे पौष्टिक लाडू

साहित्य : १ वाटी सुकवलेल्या शेवग्याच्या शेंगांचे पीठ (सुकवलेल्या शेंगा मिक्सरमध्ये वाटून पीठ तयार करा), १ वाटी हिरव्या मुगाचे पीठ, २ चमचे गव्हाचे जाडसर पीठ, १ वाटी अख्ख्या उडदाचे पीठ, २०० ग्रॅम साजूक तूप, १/२ वाटी गूळ, २ चमचे कलिंगडाच्या बिया, १ चमचा जायफळ पावडर, ५-६ काजू, २ चमचे मनुके, ५-६ खजूर, ३-४ बदाम.

कृती : सर्वप्रथम मुगाचे व उडदाचे पीठ तुपावर भाजून घ्या. नंतर त्यात गव्हाचे व शेवगाच्या शेंगाचे पीठ एकत्र करून लालसर भाजा. बदाम, काजू, खजुराचे बारीक तुकडे करून घ्या. गुळाचा पाक करून त्यात काजू, बदाम, खजुराचे तुकडे, कलिंगडाच्या बिया, मनुके, भाजलेली पिठे व जायफळ पावडर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रण गरम असतानाच लाडू वळा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अंजली बोन्द्रे, डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.