सालन | yakhni pulao | yakhni pulao recipe | yakhni recipe | mirchi salan | salan with biryani

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन | मोहसिना मुकादम | Yakhni pulao with mirchi ka salan | Mohsina Mukadam

अखनी पुलाव विथ मिर्च का सालन

साहित्य: ३०० ग्रॅम मटण, ११/२ कप बासमती तांदूळ, ११/२ कप चणाडाळ, १ कप दही, ४ कांदे, १ मध्यम गड्डा लसूण, १ इंच आले,  ४-५ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा साजूक तूप, आवश्यकतेनुसार तेल, मीठ, काजू, बेदाणे व पाणी.

मसाले:१ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा बडीशेप, १ मोठा चमचा जिरे, ३-४ वेलची, १ तुकडा दालचिनी, २-३ लवंग, १/२ छोटा चमचा  काळीमिरी. (सर्व मसाला खडबडीत कुटून घ्या.)

कृती: चणाडाळ २ ते ३ तास भिजवून घ्या. तांदूळ स्वच्छ धुऊन १/२ तास पाण्यात भिजवा. आले-लसूण-मिरचीचा ठेचा करा. एक कांदा बारीक चिरून घ्या. उरलेले तीन कांदे उभे पातळ कापा. कुकर-मध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि ठेचा घालून परता. त्यात मटण घालून परतून घ्या. खडबडीत कुटलेला मसाला मलमलच्या कपड्यात घालून पुरचुंडी बनवून मटणात घाला. कुकरचे झाकण लावून मटण शिजवून घ्या. मटण शिजल्यावर सूप गाळून घ्या. तेल गरम करून त्यात काजू आणि बेदाणे तळून घ्या. उभा चिरलेला कांदा तेलात कुरकुरीत तळून घ्या. शिजवलेल्या मटणाचे तुकडे तेलात परतून घ्या आणि बाजूला ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकरमध्ये कांदा/मटण तळलेले थोडेसे तेल घाला व त्यावर तांदूळ व चणाडाळ परता. मटणाचे सूप उकळून तांदळात घाला. मटणाचे तुकडे, चवीनुसार मीठ घाला. पुलाव शिजल्यानंतर त्यात साजूक तूप घाला. तळलेला कांदा, काजू व बेदाण्याने सजवा.

टीप: शिजलेल्या मटणाच्या सूपला अखनी म्हणतात. सूप मोजून गरज वाटल्यास त्यात पाणी घालून तीन कप करू शकता.

मिर्च का सालन

साहित्य :१/४ किलो फुगीर लांब मिरच्या, २ कांदे, १/४ कप सुके खोबरे, १ छोटा चमचा चारोळी, १ छोटा चमचा सफेद तीळ, १ छोटा चमचा धणे, १/२ चमचा जिरे, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, १०-१२ कढीपत्ता, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, लिंबाएवढी चिंच.

कृती :सर्वप्रथम पाण्यात मीठ घालून उकळवा. त्यात मध्यभागी चीर दिलेल्या मिरच्या अर्धा तास ठेवा. त्यानंतर मिरच्या पेपर नॅपकीनवर काढून सुकू द्या. मिरच्या सुकल्यानंतर तेल गरम करून तळून घ्या. खोबरे, तीळ, चारोळी, धणे, जिरे खरपूस व कोरडे भाजून घ्या. एक कांदा उभा चिरून तेलात फ्राय करा. भाजलेला मसाला व तळलेला कांदा एकत्र वाटा. उरलेला कांदा बारीक चिरा व चिंचेचा कोळ काढा. पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात कढीपत्ता व चिरलेला कांदा घालून लालसर होऊ द्या. आले-लसूण पेस्ट, मिक्सरमध्ये वाटलेले वाटण, हळद घालून तेल सुटेस्तोवर परतवा. त्यात चिंचेचा कोळ, मीठ घालून पुन्हा एकदा परतवा. मसाला कोरडा वाटल्यास त्यात थोडे पाणी घाला. तळलेल्या मिरच्या घालून मिश्रण एकजीव करा. भांड्यावर झाकण ठेवून वाफ काढा. कोथिंबिरीने सजवा.

टीप: मसाला मिरच्यांच्या अंगसर असला पाहिजे.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मोहसिना मुकादम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.