मुखवास | Mukhwas Recipe | After snack food | Digestive food | Snack food

आयुर्वेदिक मुखवास | प्रियांका महाले, ठाणे

आयुर्वेदिक मुखवास

साहित्य :५-६ लिंबांची साले, २ ते ३ मोसंबी-डाळिंबांची साले, सालीसह किसलेले १/२ सफरचंद, ४-५ चमचे किसलेल्या कलिंगडाचा पांढरा भाग, ५-६ चमचे किसलेला आवळा, ३-४ चमचे भाजलेले जवस, ११/२ मोठा चमचा ओवा, ५-६ पुदिन्याची पाने, ३-४ चमचे काळे तीळ, काळे मनुके, १ मोठा चमचा भाजलेले मिरे-जिरे पूड,५-६ ज्येष्ठमधाच्या काड्या, २ चमचे खडीसाखर, ४-५ चमचे सुकलेल्या मगज-काकडी-सूर्यफूल बिया, १ चमचा भाजलेला ओवा, १/२ चमचा मध, ५-६ केशर काड्या, २ चमचे चाट मसाला व भाजलेली बडीशेप, १/२ चमचा शेपा, आवश्यकतेनुसार तूप

कृती :

  • प्रथम लिंबांची व मोसंबी-डाळिंबांची साले पाच ते सहा तास पाण्यात भिजत घाला
  • नंतर ही सर्व साले जाडसर किसून घ्याकिसलेला सफरचंद, कलिंगडाचा पांढरा भाग व लिंबांच्या सालीचे तुकडे करा
  • त्यात मध, चाट मसाला, खडीसाखर, काळे मनुके, भाजलेले मिरे-जिरे पूडज्येष्ठमधाच्या काड्या, केशर काड्या एकत्र करा
  • तयार मिश्रण फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवा
  • नंतर फडक्यावर उन्हात सुकवा
  • दोन ते तीन दिवस सुकल्यानंतर कुरकुरीत होईल
  • पुदिन्याची पाने तुपात भाजून घ्या
  • ही पाने आणि भाजलेले जवस, तीळ, सुकलेल्या मगज-काकडी-सूर्यफूल बिया,बडीशेप, शेपा आणि ओवा सर्व साहित्य सुकलेल्या मिश्रणात एकत्र करा. आयुर्वेदिक मुखवास तयार.

टीप :साले ओलसर असतानाच चाट मसाला लावावा म्हणजे चव चांगली येते. 

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्रियांका महाले, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.