थंडाई पारफेई | Thandai Parfait Online

थंडाई पारफे

साहित्य :


  • २ कप घट्ट दही
  • ४ टेबलस्पून साखर
  • ४ टेबलस्पून काळे मनुके
  • ३-४ सुके अंजीर (बारीक चिरून)
  • ५-६ अक्रोड ( जाडसर कुटून)
  • १०-१२ वेफल बिस्किटस
  • २ टीस्पून बडीशेप
  • २ टीस्पून खसखस
  • १/२ टीस्पून मिरी
  • ४-५ वेलच्या
  • ८ ते १० बदाम

कृती :


  • बडीशेप, खसखस, मिरी, वेलचीचे दाणे व बदाम कोमट पाण्यात तासभर भिजवावे आणि अगदी बारीक वाटून घ्यावे.
  • मनुका आणि अंजीर पाण्यात भिजवावे. वॅफल्सचे तुकडे करावे.
  • दही, साखर आणि वाटलेला अर्धा थंडाई मसाला एकत्र फेटावा व हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावे.
  • आता एका बाऊलमध्ये मनुके, चिरलेले अंजीर, अक्रोडचा कूट व उरलेला थंडाई मसाला मिसळून फ्रीजमध्ये ठेवावा.
  • सर्व्ह करताना ग्लास मध्ये आधी २ -३ टीस्पून दही, मग त्यावर मनुका अंजीर मिश्रण, वॅफल्सचे तुकडे असे थर रचावे. असे दोन वेळा करावे आणि सर्वात वर वॅफल्सचे बिस्किट लावून सर्व्ह करावे.

कालनिर्णय स्वादिष्ट आवृत्ती  – एप्रिल २०१६ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.