चाट | fruit chaat masala | dry fruit chaat | masala fruit | Salad Recipe | fruit salad | ingredient of fruit salad | recipe of fruits chaat in marathi | easy fruit chat

फ्रूट चाट | प्रीती कारगांवकर, ठाणे | Fruit Chaat | Priti Kargaonkar, Thane

फ्रूट चाट

साहित्य : ३ केळ्यांच्या गोल चिरलेल्या चकत्या, १ सफरचंदाचे साल काढून केलेले चौकोनी तुकडे, १ कप अननसाचे  तुकडे , १ छोट्या खरबुजाचे चौकोनी तुकडे, १/२ कप डाळिंबाचे दाणे, १० बी काढलेले खजूर (उभे चिरलेले), २ छोटे चमचे किसमिस आणि १/२ छोटा चमचा चाट मसाला.

चटणीसाठी साहित्य : १/२ कप बिया काढून धुतलेले जर्दाळू , १ कप साखर, १/२ कप चिंचेचा कोळ, १/२ छोटा चमचा चाट मसाला आणि ११/२ ग्लास पाणी.

चटणीची कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवा. नंतर जर्दाळू व चाट मसाला घालून ढवळत राहा. मंदाग्नीवर दहा मिनिटे शिजवा. गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट पुन्हा पॅनमध्ये घेऊन गरम करा. त्यात चिंचेचा कोळ व साखर घाला. मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होत आल्यावर चकाकी येईल. मग गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर चटणी तयार होईल.

फ्रूट चाटची कृती : काचेच्या भांड्यात कापलेली सर्व फळे एकत्र करा. आता यात कापलेले खजूर, किसमिस, डाळिंबाचे दाणे व चाट मसाला घाला. मिश्रण नीट एकजीव करा. त्यात तयार चटणी घालून व्यवस्थित ढवळा. थंड करून सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– प्रीती कारगांवकर, ठाणे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.