गुळाची पोळी कशी बनवाल –
साहित्यः
- ५०० ग्रॅम गूळ किसलेला
- १ वाटी तीळ कूट
- खसखस कूट
- ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले
- १ टेबलस्पून खोबरे
- २|| टेबलस्पून डाळीचे पीठ
- २ वाट्या कणीक
- १ वाटी मैदा
कृती:
- कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे.
- चांगला पिवळा गूळ किसून घ्यावा.
- तीळ, खसखस, खोबरे जरा भाजून घ्यावे व नंतर कुटावे किंवा यंत्रावर पूड करावी.
- २|| टेबल स्पून डाळीचे पीठ थोडया तुपावर चांगले भाजून घ्यावे.
- वेलचीची पूड करावी आणि सर्व एकत्र करून मळून ठेवावे.
- नंतर कणकेच्या दोन लाट्यात गुळाची १ मोठी गोळी घालून कडा दाबून हलक्या हाताने पोळी लाटावी.
- नंतर पुरणपोळीच्या तव्यावर खमंग भाजावी.
- गुळाची पोळी गारच चांगली लागते म्हणून अगोदर करून ठेवाव्या.
वरील प्रमाणात २० पोळया होतात.
मी माझ्या तीन रेसिपी स्पर्धेसाठी पाठवल्यात त्या आपल्याला फोटोसह मिळाल्या का? ते मला कसं कळेल?
नमस्कार मिनल, तुम्हाला इमेलवरती रिप्लाय येईल.