‘उन्हाळी लागणे’ हा प्रकार उन्हाळ्यात नवीन नाही. लघवी ‘गरम’ होणे आणि लघवीच्या जागी जळजळणे ही प्रमुख लक्षणे. कमी पाणी प्यायल्याने लघवी अॅसिडिक होते आणि त्यामुळे मूत्रमार्गावरच्या पेशींना इजा होते. यासाठी उत्तम औषध म्हणून पुढील उपाय करता येतील.
१) धने-जिऱ्याचा चहा
- २ चमचे धने, १ चमचा जिरे – दोन कप पाण्यात चांगले उकळावे.
- रात्रभर तसेच ठेवून सकाळी गाळून घ्यावे. झाला चहा!
हा चहा फ्रीजमध्ये ठेवून द्यावा व लागेल तसा, दूधसाखर खालून देशी “आईस्ड टी” घ्यावा किंवा गरम करून घ्यावा.
२) कोकम सरबत
- कोकम सरबत हे सर्वांत उत्तम औषध म्हणता येईल.
- परंतु मधुमेहींना गोड चालत नाही, त्यामुळे त्यांनी कोकम थोड्या गरम पाण्यात घालून त्यात चवीसाठी मीठ, कोथिंबीर घालून ही ‘फुटी कढी’ (नारळाच्या दुधाविना) घ्यावी.
३) नारळपाणी
- नारळपाणी तर अतिउत्तम! परंतु एक करता दुसरे होऊ नये म्हणून ज्यांना सर्दी व्हायची सवय असते त्यांनी बेताने घ्यावे.
Ms Hindustan Bakers Industries Plot no. E11, 12 Industrial Area Khalilabad Distt Sant Kabeer Nagar Uttar Pradesh Pin Code 272175 Mob No. 9984789523, 8052885035. Kal nirnay calendar Hindi 4 Pcs
Hi Tavaab,
Click on following link to buy Kalnirnay Hindi calmanac –
https://www.kalnirnay.com/shop/kalnirnay-hindi-home-calmanac-2017-pack-of-5/