ओटीसी | otc medicine list | otc pain relievers | otc products | otcs | over the counter drugs | over the counter | over the counter pharmacy | otc pharmacy | otc products in pharmacy

ओटीसी औषधे आणि आपण | डॉ. रा. वि. करंबेळकर | OTC Medicine and You | Dr. R. V. Karambelkar

ओटीसी औषधे आणि आपण

अनेकदा बहुतांश जण सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी किंवा पोटदुखीसारखे त्रास अंगावर काढतात.असे लोक आरोग्याची अशी एखादी समस्या उद्भवली, की डॉक्टरकडे जाणे टाळतात आणि स्वतःच मेडिकल स्टोअर्समधून पेनकिलर किंवा क्रोसिन, पॅरासिटॅमॉल घेऊन स्वतःवर उपचार करून घेतात.असा तात्पुरता उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.या औषधांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते, अर्थात ‘ओव्हर द काउंटर’ औषधे!

ही औषधे ग्राहकांना / रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्सशिवाय केमिस्टकडून थेट विकत घेता येतात.सध्या या औषधांसाठी कोणतीही काटेकोर नियमावली आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली नाही.त्यामुळे अशी औषधे केमिस्ट कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय ग्राहकाला थेट विकू शकतात.ओव्हर द काउंटर (ओटीसी) औषधांबाबत औषध सल्लागार समितीचे असे मत आहे, की या औषधांची तातडीने विचारपूस करण्यात यावी व त्याबाबतच्या नियमांसाठी विशिष्ट तरतुदी करण्यात याव्यात.या औषधांची सुरक्षितता, उपलब्धता व रुग्णांना त्यांची सवय लागण्याची शक्यता या मुद्यांचा विचार करून विविध गटांत त्यांची विभागणी करण्यात यावी.

कोणालाही ताप आला तर सर्वप्रथम आपण क्रोसिन (paracetamol)घेतो आणि एक-दोन दिवस वाट बघून मग डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो.अशी औषधे आपण सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब, कापणे, मुका मार अशा साध्या-साध्या (मोठ्या प्रमाणावर नसणाऱ्या) वाटणाऱ्या आजारांवर / वैद्यकीय समस्यांवर वापरतो.ही औषधे म्हणजे ‘ओव्हर द काउंटर मेडिसिन’. क्रोसिन (paracetamol),, बु्रफेन(buprofen),दोमस्टल (domperidon), कॉम्बिफ्लाम, वोलिनी ही अशा काही औषधांची उदाहरणे आहेत.अशा प्रकारची औषधे आपण मित्रांच्या किंवा कुटुंबातल्या सदस्यांच्या सल्ल्याने घेत असतो.

ही औषधे घेऊन आपण एकतर डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असतो किंवा आपले आजारपण काही काळासाठी पुढे ढकलत असतो.या औषधांमुळे आपल्याला घरबसल्या प्रथमोपचार मिळतात.त्याचबरोबर डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च व दवाखान्यात जाण्याचा वेळही वाचतो.या औषधांमुळे जरी आपली सोय होत असली, तरी ओटीसी प्रकारातील ही औषधे घेताना आपण काही खबरदारी घेणे आवश्यक असते.शक्यतो ही औषधे आपण फक्त प्रथमोपचार म्हणूनच वापरावीत.ही औषधे काही काळ घेऊनही बरे वाटत नसल्यास किंवा तब्येतीत सुधारणा होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.उदाहरणच द्यायचे झाले, तर क्रोसिनचे घेऊया.ताप आल्यावर सर्रास घेतले जाणारे हे औषध फक्त दोन-तीन दिवस घ्यावे.क्रोसिन हे औषध घेऊनही ताप कमी होत नसल्यास तापाचे कारण शोधणे आवश्यक असते, अन्यथा टायफॉइड, मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या आजाराची लक्षणे दडपली जाऊन काही दिवसांनी हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

ही औषधे जरी अपायकारक नसली, तरी प्रदीर्घ काळासाठी घेत असल्यास त्यांच्या गंभीर दुष्परिणामांना रुग्णाला तोंड द्यावे लागू शकते.उदाहरण द्यायचे झाल्यास ब्रूफेन या वेदनाशामक (पेनकिलर) औषधाचे पाहता येईल.प्रदीर्घ काळासाठी हे औषध घेत असल्यास रक्ताच्या उलट्या होऊ शकतात किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकते.ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार किंवा इतर कुठलेही कायमस्वरूपी आजार असणाऱ्या रुग्णांनी अशी वेदनाशामक औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.शक्यतो आपण आधी वापरलेली औषधे घ्यावीत, नवीन औषधे घेतल्यास अॅलर्जी होऊ शकते.

गरोदर स्त्रियांनी पहिल्या तीन महिन्यांत कुठलीही ओटीसी औषधे घेऊ नयेत.कारण पहिल्या तीन महिन्यांत बाळाचे अवयव तयार होत असतात आणि या काळात अशा कोणत्याही औषधांचा दुष्परिणाम गर्भावर होण्याची शक्यता असते.या काळात अगदी मल्टीव्हिटॅमिन्सचा वापर करणे देखील टाळावे.

काही ओटीसी प्रदीर्घ काळासाठी घेतली, तर या औषधांची सवय किंवा व्यसन लागू शकते.उदाहरणार्थ, काही कफ सिरप, ज्यामध्ये ‘देक्स्त्रोमटॉफर्न’ किंवा ‘कोडीन’सारखे घटक असतात.बराच काळ ही औषधे घेत राहिल्यास त्यांची सवय किंवा व्यसन लागू शकते, किंबहुना या प्रकारची औषधे नशा यावी म्हणूनही वापरली जातात.या प्रकारची बरीच कफ सिरप्स डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाहीत.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ.रा.वि.करंबेळकर

(लेखक फिजिशियन आहेत.)   

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.