गार्लिक प्रॉन्स विथ स्पगेटी
साहित्य: २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल, ४००-५०० ग्रॅम सोलून वाळवलेली कोळंबी, चवीनुसार मीठ, काळी मिरीपूड, ३ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, चिमूटभर रेड पेपर फ्लेक्स, १/२ कप व्हाइट वाइन, ४ मोठे चमचे बटर, अर्ध्या लिंबाचा रस, १/२ कप चिरलेली कोथिंबीर.
कृती: सर्वप्रथम कोळंबीला मीठ व मिरपूड लावून घ्या. त्यानंतर मोठ्या कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करून कोळंबी घाला. लालसर होईस्तोवर शिजू द्या. कोळंबी ताटात काढून घ्या. कढईत थोडे तेल घालून लसूण व पेपर फ्लेक्स घाला. लालसर होईस्तोवर चांगले शिजवून घ्या. त्यात व्हाइट वाइन घालून उकळी काढा. त्यात थोडे-थोडे बटर घाला. नंतर शिजवलेली कोळंबी व ताटात निघालेला रस, चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घाला. मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर गरमागरम स्पगेटी सर्व करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गिरीजा नाईक