बांगड्याचे कालवण
साहित्य: १/२ किलो बांगडे, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, ओले खोबरे (खवलेले), ६ काश्मिरी लाल सुक्या मिरच्या, १ छोटा चमचा धणे पावडर, १/२ छोटा चमचा जिरे पावडर, १/२ छोटा चमचा हळद, २ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा चमचा चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ.
कृती: बांगडा साफ करून त्याला मीठ लावून बाजूला ठेवून द्या.काश्मिरी लाल मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा.ओले खोबरे, भिजवलेल्या मिरच्या, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लसूण एकत्र वाटून घ्या आणि बाजूला ठेवून द्या.कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.आता त्यात टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत परता.यात वाटण, मीठ घाला आणि हे मिश्रण शिजवून घ्या. त्यात बांगडा घाला आणि काही मिनिटे शिजवून घ्या.त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ घाला.तुम्हाला ग्रेव्ही कती दाटसर / पातळ हवी त्यानुसार यात पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.
महत्त्व: सॅल्मन, सार्डिन, किंगफिशप्रमाणे बांगड्यामध्येही ओमेगा-३ फॅट मुबलक प्रमाणात असतात.हे फॅट्स हृदय, डोळे आणि विशेषतः मेंदूसाठी चांगले असतात. मासे कसे शिजवले जातात, हेही महत्त्वाचे आहे.तळण्याऐवजी वाफवलेले, बेक केलेले, ग्रिल केलेले मासे, माशाचे स्ट्यू आणि कालवण करणे अधिक हितकारक असते. शाकाहारी व्यक्ती बांगड्याऐवजी कोबी व मटार वापरून हा पदार्थ करू शकतात.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ.मनीषा तालीम