कैरीची कोशिंबीर
साहित्य: १ कैरी, १ इंच आले, १/२ छोटा चमचा लाल मिरचीपूड किंवा फ्लेक्स, १/२ छोटा चमचा गोडा मसाला, १/४ छोटा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, थोडा कढीपत्ता, मीठ.
कृती: कैरी आणि आले पातळ किसून घ्या. त्यांना मीठ, मिरचीपूड आणि गोडा मसाला लावा. हिंग, मोहरी, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करा आणि ती कैरी-आल्याच्या मिश्रणात घाला. १०० ग्रॅम दही घुसळून यात घातल्यास रायताही तयार आहे. त्यावर बडीशेपची पूड घाला. धपाटे किंवा थालिपीठासोबत ही कोशिंबीर खायला द्या.
महत्त्व: पिकलेला आंबा मधुमेहींना चालत नाही. अशा रुग्णांच्या रक्तातील पोटॅशिअमची पातळी सामान्य असेल, तर दिवसाला दोन फोडी खाता येतात. मधुमेहींना कैरी खाल्लेली चालते, कारण कैरीची ग्लायसेमिक इंडेक्स साधारण ५५ असते. पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरीमध्ये साखर कमी असते आणि त्यात मुबलक जीवनसत्त्वे असतात. यात फायबरही मुबलक असते. त्याची पचनाला मदत होते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. मनीषा तालीम