दुधी आणि कांद्याच्या पातीचे सूप
साहित्य: १ दूधी, ४ पातीचे कांदे (अधिक १ पातीचा कांदा सजावटीसाठी), १/४ कप दूध, १/२ छोटा चमचा मिरपूड, चिमूटभर दालचिनी पावडर (आवडीनुसार), चवीनुसार मीठ.
कृती: दूधी सोलून तुकडे करून घ्या. कांद्याची पात चिरून घ्या. दूधी व कांदा उकडा, थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता हे मिश्रण कढईत घाला, त्यात दूध, मीठ व मिरपूड घालून काही मिनिटांसाठी उकळी काढा. त्यावर चिरलेली कांद्याची पात आणि चिमूटभर दालचिनी पूड घाला.
महत्त्व: दूधी हा मधुमेहींसाठी एक उत्तम आहार आहे. यात पाण्याचे प्रमाण खूप (९०%) आणि फायबरचे प्रमाण १०% असते. हा करायला अत्यंत सोपा आणि चांगले पोषण देणारा पदार्थ आहे.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– डॉ. मनीषा तालीम