सत्तूचे सरबत
साहित्य: १ कप सत्तूचे पीठ (भाजलेले काळे चणे), ४ कप थंड पाणी, १ लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ मोठा चमचा पुदिना, १/२ छोटा चमचा मीठ.
कृती: सर्व साहित्य एकत्र करा, त्यात थोडे थोडे पाणी घाला, जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाहीत. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी सत्तूचे पीठ कमी घ्यावे. ज्यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास आहे, त्यांनी हे पेय टाळावे.
महत्त्व: सत्तू सरबत हे भारतीय प्रोटिन पेय आहे. उत्तर भारतात ते लोकप्रिय आहे. हे खर्चीक नसते आणि ते सामान्य माणसाला ऊर्जा प्रदान करते. सत्तूचे पीठ किराणा दुकानांमध्ये आणि कोकणातील पदार्थ उपलब्ध असलेल्या दुकानांमध्ये उपलब्ध असते. मधुमेहींना फळांची पेये टाळावी लागतात.त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असतो.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. मनीषा तालीम