उकडा तांदूळ पेज
साहित्य: १ वाटी कोकणी उकड्या तांदळाची कणी, ६ वाट्या पाणी, चवीनुसार मीठ.
कृती: तांदूळ एक तास भिजवून घ्या. पाणी उकळवून त्यात हा तांदूळ मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवा. शिजवताना वर झाकण ठेवू नका. त्यानंतर अर्धा तास थोडासा झाकून शिजवा. चिकट तांदूळ आणि पेज किंवा निवळ राहणे आवश्यक आहे.
महत्त्व: हा उकडा तांदूळ भिजवून, वाफवून आणि वाळवून अंशतः शिजवलेला असतो. ही पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे जीवन-सत्त्वे भातातून शितात उतरतात आणि त्याचे पोषणमूल्य वाढते. पांढऱ्या तांदळापेक्षा उकड्या तांदळात अधिक फायबर आणि प्रथिने असतात. यातील प्रतिरोधक स्टार्च पोटातील चांगल्या जिवाणूंसाठी उपयुक्त असते.