कोबीचा भानोला
साहित्य: २०० ग्रॅम कोबी, २ मोठे कांदे, ३ कप बेसन, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/२ छोटा चमचा हळद, १/२ छोटा चमचा हिंग, पाणी, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, १० मनुका, थोडा लिंबाचा रस, १/२ छोटा चमचा मीठ,
वाटणासाठी: १/२ कप खवलेले ओले खोबरे, १/२ टीस्पून जिरे, ४ लसणाच्या पाकळ्या, १/२ छोटा चमचा धणे, दालचिनीचा १ तुकडा, ३ लवंगा.
कृती: कोबी स्वच्छ धुऊन, चिरून घ्या. कांदेसुद्धा चिरून घ्या. त्यानंतर दोन्ही एकत्र करा. वाटणाचे जिन्नस वाटून घ्या आणि बाजूला ठेवा. आता बेसन व इतर जिन्नस एकत्र करून मिश्रण तयार करा आणि त्यात लिंबाचा रस घाला. ते केकच्या मिश्रणासारखे दिसायला हवे. ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला हे मिश्रण बेक करून घ्या. थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा. हे असेच खाता येऊ शकतात किंवा थोड्याशा तेलात तव्यावर भाजून खाता येतील.
महत्त्व: कोबीमध्ये कमी कॅलरीज असतात आणि कोबीची ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असते. यातील फायबरमुळे पचनाला मदत होते. खोबऱ्यात कोलेस्ट्रॉल नसते, तर यात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यात मीडियम चेन फॅटी अॅसिड असते, जे चरबी जाळण्यासाठी उपयुक्त असते. यातील मँगेनीज आपल्या हाडांसाठी हितकारक असते. खोबऱ्यातील लॉरिक अॅसिडमध्ये अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुणधर्म असतात.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
डॉ. मनीषा तालीम