मिलेट्स – फ्रुट चाट साहित्य : प्रत्येकी १ लहान केळे, काकडी आणि सफरचंद (याशिवाय आवडीची फळे घेऊ शकता.) ४-५ भिजवलेले बदाम, प्रत्येकी १-२ लहान चमचे मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, कोथिंबीर, १/२ लहान चमचा चाट मसाला, लिंबू, १ मोठा चमचा मध, १ लहान चमचा जिरे-मिरेपूड, १ वाटी कोणत्याही मिलेटचे रेडी टू इट पोहे / चुरमुरे. कृती : आजकाल […]
Kalnirnay Arogya 2024
उमलत्या कळ्यांचे भावविश्व | डॉ. विकास देशमुख | Emotional World of Growing Buds | Dr. Vikas Deshmukh
उमलत्या कळ्यांचे भावविश्व ‘‘अनयचे वागणे बिलकुल चांगले नाही. तो शाळेत सतत गैरहजर असतो, विद्यार्थ्यांसोबत मारामारी करणे, शिव्या देणे, शिक्षकांशी उद्धटपणे बोलणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. तो काही व्यसन करतो का?’’ अशी शंका अनयच्या वर्गशिक्षिका देशपांडे मॅडम यांनी त्याच्या पालकांकडे व्यक्त केली.ओपन हाऊससाठी शाळेत गेलेल्या अनयच्या आईवडिलांना शिक्षकांनी व्यक्त केलेली शंका आणि त्याची मार्कलिस्ट पाहून धक्काच […]
साबुदाणा बीट बॉल्स | कांचन बापट | Sabudana Beetroot Balls | Kanchan Bapat
साबुदाणा बीट बॉल्स साहित्य : १ वाटी भिजवलेला साबुदाणा, २ उकडलेले बटाटे, १/२ वाटी बिटाचा कीस, २ लहान चमचे भरडलेले धणे-जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा, चीज (ऐच्छिक). कृती : बटाटा आणि बीट किसा. साबुदाण्यामध्ये बटाटा व बिटाचा किस, भरडलेले धणे-जिरे, सोडा, कोथिंबीर आणि मीठ घालून मळून घ्या. चीजचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करा. […]
टूथपेस्ट आणि टूथब्रश निवडताना…| रश्मी वीरेन | How to choose toothpaste and toothbrushes | Rashmi Viren
टूथपेस्ट आणि टूथब्रश निवडताना एखाद्याचे व्यक्तिम॔व त्याच्या हास्यामुळे अधिक सुंदर भासते. ते हास्य निर्मळ बनवण्यात दातांचा वाटा मोठा असतो. एवढेच नव्हे, तर आपला आहार, त्याचे चर्वण, पचनक्रिया, शब्दोच्चार म्हणजेच एकंदर आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात दातांवर अवलंबून असते. म्हणूनच आपल्या दातांची निगा घेणे आवश्यक असते. मात्र निगा घ्यायची म्हणजे नेमके काय तर सकाळी आणि रात्री झोपताना […]
मेथी-केळी पुरी / पराठा | कांचन बापट | Methi-Banana Puri/ Paratha | Kanchan Bapat
मेथी-केळी पुरी / पराठा साहित्य : १ केळे, अर्धा ते पाऊण वाटी मेथीची भाजी, आवश्यकतेनुसार कणीक, १ मोठा चमचा बेसन, प्रत्येकी १ छोटा चमचा ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा (ऐच्छिक). कृती : केळ्याची प्युरी करा किंवा केळे हाताने कुस्करून घेतले तरी छान मऊ होते. त्यात मेथी भाजी, बेसन, जिरे, ओवा आणि मीठ […]
इअरफोनचा वापर, कानास काळ! | डॉ. दिव्य प्रभात | The use of earphones, bad for ears! | Dr. Divya Prabhat
इअरफोनचा वापर, कानास काळ! सध्याच्या काळात सतत इअरफोन / ब्लू टूथ वापरणे हे आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहे. फोनवर बोलण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, प्रवासात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम पाहण्यासाठी इअरफोन / ब्लू टूथचा सर्रास वापर केला जातो. स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही असा वापर करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. इअरफोन / ब्लू टूथमधून येणारा आवाज कानाच्या पडद्यावर थेट आदळतो. काही वेळासाठी इअर-फोनचा […]
मिलेट्स पानगी | कांचन बापट | Millets Panagi | Kanchan Bapat
मिलेट्स पानगी साहित्य: १ वाटी कोणत्याही मिलेट्सचे (भरड धान्याचे) पीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी, तेल, केळ्याची किंवा कर्दळीची पाने. कृती: पिठात तेल आणि मीठ घाला. त्यात लागेल तेवढे दूध किंवा पाणी घालून पातळसर पीठ भिजवा. त्यात लसूण घालून दहा-पंधरा मिनिटे झाकून ठेवा. पानगी करताना केळ्याच्या पानावर पातळसर पानगी […]
सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका | रेश्मा आंबेकर | The growing threat of Microplastics | Reshma Ambekar
सूक्ष्म प्लास्टिकचा वाढता धोका ‘एन्व्हॉयर्न्मेण्ट इंटरनॅशनल’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात मानवी रक्तामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. मायक्रोप्लास्टिकने हवा, पाणी, मातीत शिरकाव केल्याचे आपल्याला ज्ञान असले तरी मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याने या समस्येने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलत्या आधुनिक जगाची ही समस्या […]
होलमील नाचणी ऑम्लेट | कांचन बापट | Wholemeal Ragi Omlete | Kanchan Bapat
होलमील नाचणी ऑम्लेट साहित्य : ३/४ वाटी नाचणीचा रवा किंवा पीठ, प्रत्येकी १/४ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे आणि पालक, एखादी कमी तिखट मिरची, कोथिंबीर, ओव्याची पाने, मीठ, तेल / तूप, २ अंडी (ऐच्छिक). कृती : पालक, कोथिंबीर आणि मिरची चिरून घ्या. स्वीट कॉर्नचे दाणे थोडेसे ठेचा. नाचणीचा रवा असेल तर कोरडा भाजा. भाजलेला रवा किंवा पीठ लागेल […]
संतुलित आहारातील षड्रसांचे महत्त्व | डॉ. राजश्री चव्हाण | Importance of Taste in a balanced diet | Dr Rajshree Chavan
संतुलित आहारातील षड्रसांचे महत्त्व आहार कसा असावा, याचे योग्य ते मार्गदर्शन आयुर्वेदात केलेले पाहायला मिळते. पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या आपल्या शरीराचे पोषण षड्रसात्मक म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि कडू या चवींनी परिपूर्ण आहाराने होत असते. आहारातील याच सहा चवींचे अर्थात रसांचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. षड्रस म्हणजे काय? रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार […]