हरभरा उसळ पाव
साहित्य: १ वाटी हरभरा, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, १/४ वाटी खोबरे, प्रत्येकी १ मोठा चमचा तीळ, शेंगदाणे, १ छोटा चमचा गरम मसाला, तेल, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती: हरभऱ्याला छान मोड आणून घ्या. मोड आलेले हरभरे कुकरमध्ये दोन-तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कांदा लांब चिरा. खोबरे किसून घ्या.लोखंडी कढईत थोडेसे तेल गरम करा. त्यात कांदा चांगला लालसर होईपर्यंत परता. त्यात खोबरे, तीळ, दाणे, आले, लसूण आणि थोडी कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर वाटून घ्या. एक-दोन मोठे चमचे तेलावर वाटलेला मसाला घालून परता. तेल सुटायला लागल्यावर शिजलेले चणे / हरभरे घालून परता. त्यात गरम पाणी, मीठ घालून शिजवा. दोन-तीन मिनिटांनी गरम मसाला घालून ढवळा. वरून कोथिंबीर घाला. सोबत पाव किंवा पोळी द्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट