देसी हेल्दी सँडविच
साहित्य: ११/२-२ वाट्या बाजरी, नाचणी तसेच राजगिरा किंवा वरीचे पीठ, मीठ.
सारणासाठी: १ जुडी पालक, २ गावरान टोमॅटो, ८-१० लसूण पाकळ्या, २-३ मिरच्या, १ लहान चमचा दाण्याचे कूट, भरपूर कोथिंबीर, तेल / तूप किंवा बटर, जिरे, मीठ.
कृती: सगळी पिठे एकत्र करून त्यात मीठ घाला. लागेल तसे गरम पाणी वापरून पीठ भिजवा. पीठ छान मळून घेऊन त्याच्या भाकऱ्या करा. सगळ्या भाज्या बारीक चिरा. लसूण, मिरची जाडसर ठेचा. अर्धा मोठा चमचा तेलाची फोडणी करून त्यात जिरे, लसूण, मिरची घालून परतवून घ्या.त्यात टोमॅटो घालून परता. टोमॅटो शिजल्यावर पालक घालून परतवून मिश्रण कोरडे होऊ द्या. त्यात कोथिंबीर, दाण्याचे कूट आणि मीठ घालून मिञ्चस करून उतरवा. भाकरीला बटर लावून त्यावर तयार मिश्रण पसरवून वरून दुसरी भाकरी ठेवा. कापून डद्ब्रयात भरा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– कांचन बापट