मँगो पॅनकेक
साहित्य: १ वाटी कणीक, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, २-३ मोठे चमचे साखर, १/२ ते ३/४ वाटी आंद्ब्रयाचा रस, तूप किंवा बटर, लागेल तसे दूध किंवा पाणी.
कृती: कणीक आणि बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. त्यात साखर आणि आंद्ब्रयाचा रस घाला व एकजीव करा. लागेल तसे दूध किंवा पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा. बलून व्हिस्क किंवा फोर्क वापरून पीठ मऊ करून घ्या. तवा तापायला ठेवा. त्यावर थोडे तूप लावून जाडसर पॅनकेक घाला.साधारण पातळ उ॔ाप्यासारखे करा. झाकण ठेवा. मंद गॅसवर शिजवा. खालच्या बाजूने लालसर भाजला गेला, की थोडे तूप सोडून उलटवा. दोन्ही बाजूंनी भाजले गेल्यावर उतरवा. असेच बाकीचेही पॅनकेञ्चस करा. या प्रमाणात तीन-चार पॅनकेञ्चस तयार होतात. याच्याबरोबर बटर किंवा सिरप देऊ शकता.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट