मिलेट्स पानगी
साहित्य: १ वाटी कोणत्याही मिलेट्सचे (भरड धान्याचे) पीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, मीठ, आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी, तेल, केळ्याची किंवा कर्दळीची पाने.
कृती: पिठात तेल आणि मीठ घाला. त्यात लागेल तेवढे दूध किंवा पाणी घालून पातळसर पीठ भिजवा. त्यात लसूण घालून दहा-पंधरा मिनिटे झाकून ठेवा. पानगी करताना केळ्याच्या पानावर पातळसर पानगी थापा, वरून पान झाका. तव्यावर तयार पान ठेवा. पान खालच्या बाजूने चांगला भाजून झाल्यावर पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी पानगी छान भाजून घ्या. लसूण चटणीबरोबर पानगी मस्त लागते.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट