होलमील नाचणी ऑम्लेट
साहित्य : ३/४ वाटी नाचणीचा रवा किंवा पीठ, प्रत्येकी १/४ वाटी स्वीट कॉर्नचे दाणे आणि पालक, एखादी कमी तिखट मिरची, कोथिंबीर, ओव्याची पाने, मीठ, तेल / तूप, २ अंडी (ऐच्छिक).
कृती : पालक, कोथिंबीर आणि मिरची चिरून घ्या. स्वीट कॉर्नचे दाणे थोडेसे ठेचा. नाचणीचा रवा असेल तर कोरडा भाजा. भाजलेला रवा किंवा पीठ लागेल तसे पाणी वापरून पातळसर भिजवून झाकून ठेवा. दहा-पंधरा मिनिटांनंतर त्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या, फेटलेली अंडी, मीठ आणि ओव्याची कुस्करलेली पाने एकजीव करा. नॉनस्टिक तव्यावर पातळसर ऑक्वलेट घालून झाकण ठेवा. खालची बाजू लालसर झाली की कडेने तेल सोडून ऑक्वलेट सोडवून घेऊन उलटवा. दोन्ही बाजूंनी लालसर झाल्यावर उतरवा. कोणतीही चटणी किंवा सॉसबरोबर डब्यात द्या.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट