मेथी-केळी पुरी / पराठा
साहित्य : १ केळे, अर्धा ते पाऊण वाटी मेथीची भाजी, आवश्यकतेनुसार कणीक, १ मोठा चमचा बेसन, प्रत्येकी १ छोटा चमचा ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, तळणासाठी तेल, चिमूटभर सोडा (ऐच्छिक).
कृती : केळ्याची प्युरी करा किंवा केळे हाताने कुस्करून घेतले तरी छान मऊ होते. त्यात मेथी भाजी, बेसन, जिरे, ओवा आणि मीठ घालून एकजीव करा. त्यात मावेल एवढी कणीक आणि चिमूटभर सोडा घालून घट्ट मळून घ्या. पाच-दहा मिनिटे कणीक झाकून ठेवा. मध्यम आकाराचे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. गरम तेलावर पुऱ्या खमंग तळून घ्या. या पिठाचे पराठेही करता येतील. पुरी/ पराठे लोणचे किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट